जून-जुलैपेक्षा कमी होणाऱ्या पावसाने वाढवली चिंता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

नाशिक - राज्यातील गेल्या पाच वर्षांमधील पावसाळ्यातील सुरवातीच्या जून-जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांतील पर्जन्याची हजेरी पाहता, पहिल्या दोन महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाला आहे. सद्यःस्थितीत राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यात नाशिक आणि औरंगाबाद विभागामध्ये समस्या गंभीर आहे. 

पावसाची राज्यात आतापर्यंत 89.8 टक्के इतकी नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक 115.6 टक्के पाऊस कोकण विभागात झाला आहे. नागपूर, पुणे, अमरावती विभागात पावसाची हजेरी 90 टक्‍क्‍यांहून अधिक राहिली असली, तरीही नाशिक विभागात 72.9 आणि औरंगाबाद विभागात 77.7 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु अशा 3 हजार 265 धरणांतील जलसाठा 51.21 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणांमध्ये 50.76 टक्के जलसाठा होता. 

विभागनिहाय धरणांची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात यंदाच्या आतापर्यंत आणि गेल्यावर्षीच्या 3 ऑगस्टपर्यंतच्या धरणातील जलसाठ्याची अनुक्रमे टक्केवारी दर्शवते) ः अमरावती : 445 (35.39- 21.62), कोकण : 176 (85.15- 86.72), नागपूर : 385 (38.16- 19.07), नाशिक : 571 (45.69- 55.7), पुणे : 725 (68.99- 70.92), मराठवाडा : 963 (20.13- 25.16). 

दरम्यान, देशात यंदाच्या पावसाळ्यात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत 8 टक्के कमी पर्जन्यमान झाले आहे. सर्वसाधारण पर्जन्याच्या तुलनेत केरळमध्ये 16, महाराष्ट्रात 7, दमण- दिवमध्ये 45, दादरा- नगर- हवेलीमध्ये 29, ओरिसामध्ये 4, राजस्थानमध्ये 6, सिक्कीममध्ये 11 टक्के अधिक झालेल्या पावसाचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये पावसाची तूट मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्राने उद्यापासून (ता. 4) 8 ऑगस्टपर्यंत हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. या कालावधीत दिवसाला 4 ते 5 मिलिमीटर पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rains percentage less in Maharashtra