विठुरायाच्या दर्शनाला पंधरा तास

अभय जोशी
शनिवार, 21 जुलै 2018

घुसखोरीमुळे भाविकांमध्ये वैताग; दोन लाख वारकरी दाखल
पंढरपूर - विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने सुमारे दोन लाख वारकरी येथे दाखल झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज आठ क्रमांकाच्या पत्राशेडपर्यंत गेली होती. दर्शनरांगेत घुसखोरी होत असल्यामुळे दर्शनासाठी आज पंधरा तास लागत होते.

श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर परिसर आणि चंद्रभागेच्या वाळवंटात आज भाविकांची गर्दी दिसू लागली होती. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीने नेमलेल्या खासगी ठेकेदाराची यंदा यात्रेत स्वच्छतेसाठी चांगली मदत होत आहे.

यात्रेत गर्दीच्या रस्त्यावर जड वाहने येऊ नयेत यासाठी पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवर तात्पुरते लोखंडी कठडे उभे केले आहेत. गावाच्या बाहेरदेखील जड वाहने पर्यायी रस्त्यावरून जावीत अशी व्यवस्था पोलिसांनी केली आहे. बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम आज सुरू होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aashadhi ekadashi vittal darshan line

टॅग्स