wari 2019 : वारीतील शिस्तीचा आविष्कार अविस्मरणीय 

विलास काटे
Thursday, 4 July 2019

तरडगाव - ‘‘पंढरीच्या वारीबद्दल खूप ऐकले होते. यंदा वारीत सहभागी झाल्याने, इतके लाखो लोक का येतात, हे कळू शकले. वारीच्या काळात सर्वांच्या जीवनाचे ध्येय हे पंढरीचा विठ्ठल असते, त्यामुळे कोणताही त्रास किंवा चिंता वाटत नाही. तणावमुक्त जीवन म्हणजे पंढरीची वारी होय. चांदोबाच्या लिंबाजवळ आज पाहिलेले रिंगण किती समजले, हे माहीत नाही; पण जे काही पाहिले, ते डोळे दिपवणारे होते. शिस्तीचा हा आविष्कार अविस्मरणीय आहे,’’ अशी भावना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात राहणारी स्मिता गिते हिने  व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीत स्मिता पहिल्यांदाच सहभागी झाली आहे. वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात ती शिकत आहे. ती शंभर क्रमांकाच्या दिंडीतून वाटचाल करते. चांदोबाच्या रिंगणानंतर दिंड्यांमधील खेळांत ती रंगली होती. तिच्याशी संवाद साधला. ती म्हणाली, ‘‘अन्य वेळी मोकळीक असली, तरी तिला मर्यादा असतात; पण वारीत केवळ सात्त्विक प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे लहानापासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वारकरी आपले होऊन जातात. वय, जात, धर्म यांची कोणतीही मर्यादा नाही. सर्वांचे ध्येय एकच असल्याने एकमेकांमध्ये समानत्वाची भावना असते. नातलग सांभाळणार नाहीत, इतके सुरक्षित वातावरण वारीत असते. प्रत्येक जण आपल्यातील एक सदस्य आहे असे वाटते. दैनंदिन जीवन आणि वारीत खूप फरक आहे. रिंगण सोहळा किती शिस्तीत असतो, ते पाहून डोळे दिपले. कधीही वारी चुकविणार नाही.’’ 

पहिले उभे रिंगण रंगले
माउलींच्या पालखी सोहळ्यात आजच्या पहिल्या रिंगणाने वारकऱ्यांमध्ये चैतन्य संचारले. रामभाऊ चोपदार यांनी अश्वाला रिंगण दाखविले. रात्री पालखी तरडगाव मुक्कामी विसावली. गुरुवारी सायंकाळी पालखी संस्थानिकांची नगरी असलेल्या फलटणमध्ये मुक्कामी जाईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discipline in the wari Unforgettable