wari 2019 : वारकऱ्यांना मोफत रोपेवाटप 

भारत नागणे
Monday, 8 July 2019

पंढरपूर - आषाढीवारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक असे विविध उपक्रम राबवले जातात. यंदाच्या आषाढीवारीत प्रथमच वन विभागाच्या वतीने विठू दर्शनासाठी आलेल्या सुमारे 1 लाख वारकऱ्यांना मोफत रोपे वाटून पर्यावरणपूरक आषाढी सोहळा साजरा करण्याचा संकल्प केला आहे. 

या उपक्रमाची सोलापूर आणि पंढरपूर वन विभागाने जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती पंढरपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी विलास पवळे यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विठ्ठल भक्त आहेत. आषाढी कार्तिकीची ती नित्यनेमाने वारी करतात. पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भक्तांना थोडासा विरंगुळा, विश्रांती मिळावी याबरोबच महाराष्ट्रातील साधू- संतांच्या कार्याची महती सहज समजावी यासाठी त्यांनी वन विभागाच्या वतीने सुमारे 13 कोटी रुपये खर्च करून तुळशीवृंदावन पर्यटन केंद्र उभारले आहे. त्याला चांगला प्रतिसाद आहे. यानंतर आता वन विभागाने विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सुमारे 1 लाख भाविकांना परतीच्या वेळी वड, पिंपळ, चिंच. पेरू, लिंब, सीताफळ, बहावा अशी विविध प्रकारची मोफत रोपेवाटप करण्याचा संकल्प सोडला आहे. आषाढीवारी संपल्यानंतर 16 जून रोजी पंढरपूरच्या सर्वच प्रमुख मार्गावर 101 स्टॉल लावले जाणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of free seedlings to Warakari