esakal | पुरंदावडेत माउलींचे गोल रिंगण उत्साहात 
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदावडेत माउलींचे गोल रिंगण उत्साहात 

माउली... माउली...च्या नामघोषांत श्री संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज पुरंदावडे, ता. माळशिरस येथे अपार उत्साहात पार पडले. 

पुरंदावडेत माउलींचे गोल रिंगण उत्साहात 

sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते - माउली... माउली...च्या नामघोषांत श्री संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज पुरंदावडे, ता. माळशिरस येथे अपार उत्साहात पार पडले. 

नातेपुते येथे पहाटे 5 ला पालखी सोहळाप्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर सकाळी 6.30 वा. सोहळ्याने माळशिरसकडे प्रस्थान ठेवले. सकाळचा विसावा मांडवे ओढ्यावर झाला. याठिकाणी माउलींना नैवेद्य व जेवणे झाली. आज सकाळी माउली निघाल्यापासून ढगाळ वातावरण होते. भिरभिरत्या वाऱ्यात लाखो वारकऱ्यांसह विश्व माउलींचा वैभवी सोहळा पुरंदावडे येथील भव्य मैदानात दुपारी 1.30 वा. दाखल झाला. या वेळी राजाभाऊ व रामभाऊ चोपदारांनी ओळीने दिंड्या आत सोडल्या. रिंगण मैदानाला प्रदक्षिणा करून दिंड्यादिंड्यांमधून पाऊले खेळत नामघोष सुरू होता. दरम्यान, पताकाधारी वारकऱ्यांना माउलींच्या पालखीच्या सभोवती उभे करण्यात आले. चोपदारांनी अश्वस्वार तुकाराम कोळी यांस अश्व सोडण्याची सूचना दिली. यानंतर माउलींचा अश्व सोडण्यात आला. माउलींच्या अश्वाने दौडण्यास सुरवात करताच लाखो उपस्थितांनी टाळ्या वाजवत माउली... माउली...चा गजर सुरू केला व दोनच मिनिटांत रिंगण पूर्ण झाले. रिंगण पूर्ण होताच उपस्थितांनी अश्वाच्या टाचेखालची माती कपाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.