wari 2019 : चुकलेल्या वारकऱ्यांना सुखरूप सोडले दिंडीत    

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 July 2019

‘सकाळ’चे ज्येष्ठ पत्रकार, श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार बाबूराव चोपदार यांच्या संकल्पनेतून, सकाळ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून ‘जाऊ देवाचिया गावा’ उपक्रम सुरू आहे.

वाल्हे - आषाढी वारीत चालताना दिंडीतून चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीत नेऊन सोडण्याच्या ‘जाऊ देवाचिया गावा’ उपक्रमाला सासवडमधील तळावर प्रारंभ झाला. सासवड आणि जेजुरी तळावर सुमारे २३५ वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीत सोडण्याचे काम स्वयंसेवकांनी केले.

‘सकाळ’चे ज्येष्ठ पत्रकार, श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार बाबूराव चोपदार यांच्या संकल्पनेतून, सकाळ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून ‘जाऊ देवाचिया गावा’ उपक्रम सुरू आहे. चोपदार फाउंडेशननेही काही वर्षे त्यात सहभाग घेतला. बाबूराव चोपदार यांनी दिंड्यांच्या प्रत्येक मुक्कामाच्या

गावातील पत्त्यांचे संकलन केले. यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यासाठी राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सासवड पालखीतळावर वाघीरे महाविद्यालयाचे एनसीसीचे वीस विद्यार्थी तसेच सकाळ सोशल फाउंडेशनचे स्वयंसेवक प्रवीण ठुबे, अर्जुन लांडे यांनी चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीत सोडले. त्यांना प्रा. दीपक जांभळे व श्रीकृष्ण नेवसे यांनी मार्गदर्शन केले. जेजुरी तळावर जिजामाता हायस्कूल अँड जुनियर कॉलेजचे आरएसपीचे वीस विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले. त्यांना सोमनाथ उबाळे, राघू हारूळे आणि तानाजी झगडे यांनी मार्गदर्शन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Social Foundation