police bharati, solapur
sakal
पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहर पोलिस दलातील ७९ आणि ग्रामीण पोलिसांकडील ९० जागांसाठी मैदानी चाचणी पार पडली. त्यात सोलापूर शहर पोलिस दलाकडे १६५५ आणि ग्रामीण पोलिसांकडे १५११ उमेदवार मैदानी चाचणीत यशस्वी ठरले आहेत. त्यातून आता एका पदासाठी १० उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. तत्पूर्वी, मैदानी चाचणी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
पोलिस भरतीत शिपाई, बॅण्डस्मन अशी पदे भरली जात आहेत. त्याचा पहिला टप्पा मैदानी चाचणीचा तर दुसरा टप्पा लेखी परीक्षेचा असतो. सोलापूर शहर पोलिसांनी १४ फेब्रुवारीपर्यंत तर ग्रामीण पोलिसांनी १७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली. दरम्यान, एकाच उमेदवाराने एकापेक्षा अनेक शहर-ग्रामीणमध्ये पोलिस भरतीसाठी अर्ज केले होते. त्यामुळे शहर व ग्रामीण पोलिस दलातील भरतीसाठी अर्ज करूनही दोन हजार ८७७ उमेदवार मैदानीसाठी आलेच नाहीत.
आता मैदानी चाचणीत उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मेसेज पाठवून त्यांना लेखीसाठी बोलावले जाणार आहे. राज्यातील सर्वच उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा होणार आहे. मुंबई, पुण्यातील उमेदवारांची संख्या अधिक असल्याने त्यांची मैदानी चाचणी आणखी काही दिवस चालणार आहे. त्यामुळे लेखी परीक्षा साधारणत: मार्चअखेर होऊ शकते. तोपर्यंत मैदानीत यशस्वी झालेल्या उमेदवारांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे.
सोलापूर शहर पोलिसांकडील स्थिती
एकूण पदभरती
७९
एकूण अर्जदार
४१५१
उपस्थित उमेदवार
२,७०६
‘मैदानी’त पात्र
१,६५५
-------------------------------------------------------------------------
सोलापूर ग्रामीण पोलिसांकडील स्थिती
एकूण पदभरती
९०
एकूण उमेदवार
४,१८३
उपस्थित उमेदवार
२,७५१
‘मैदानी’त पात्र
१,५११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

