Aadhar Card Link : आधार लिंक नसल्याने दहा लाख लाभार्थी वंचित; निराधार, श्रावणबाळ योजनांचा लाभ झाला बंद

राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना राबविली जात आहे.
aadhar card link
aadhar card linksakal
Updated on

मुंबई - राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना राबविली जात आहे. मात्र या योजनेतील तब्बल १० लाख लाभार्थींची बँक खाती आधार कार्डशी जोडली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून या लाभार्थी अर्थसाहाय्य बंद करण्यात आले आहे. लाभ मिळत नसल्याने जिल्हा बँकांसह अन्य बँकेत लाभार्थी फेऱ्या मारत असून, त्याठिकाणी वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत.

निराधार व्यक्ती, अंध, विकलांग, अनाथ मुले, दीर्घ आजारी असणाऱ्या व्यक्ती, घटस्फोटीत स्त्रिया आदी लाभार्थींना संजय गांधी निराधार योजनेतून तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतूनदेखील निराधारांना प्रत्येकी १,५०० रुपये आर्थिक लाभ दिला जातो. यापूर्वी लाभार्थींच्या याद्या बँकांना दिल्या जात.

या याद्यांच्या आधारे बँकेकडून लाभार्थींच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा केली जात होती. शासनाने आता लाभार्थींच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२४ पासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

लाभार्थींना थेट लाभ हस्तांतर करण्यापूर्वी त्यांची बँक खाती आधार कार्डशी जोडण्याचे आदेश बँक आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र सर्वच लाभार्थींची बँक खाती ‘आधार’शी संलग्न करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. हा प्रश्न वेळीच सोडविला नाहीतर लाभार्थींचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या ४३ लाख लाभार्थ्यांची यादी सामाजिक न्याय विभागाकडे यापूर्वीच देण्यात आली आहे. या यादीत आधार लिंक नसणारी, दुबार असणारी खाती शोधली जात आहेत. आधार लिंक नसणाऱ्या तर १० लाख लाभार्थींचे लाभ थांबवण्यात आले आहेत. ही यादी आणखी काटेकोर तपासली जाणार असून बरेच लाभार्थी या यादीतून कमी होतील, असे सामाजिक न्याय विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक लाभार्थींचे लाभ जमा होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र बँकेकडे ज्यांचे आधार लिंक आहे, अशा लाभार्थींना लाभ मिळत आहे. तहसील कार्यालय लाभार्थींचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याचे काम करत असून, आतापर्यंत किती लाभार्थींची बँक खाती ‘आधार’शी जोडली याची माहिती नाही.

- जी. एम. शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

  • निराधार व श्रावणबाळ योजना लाभार्थी - ४३ लाख

  • पोर्टलवर माहिती उपलब्ध असणारे - २९,७७,३५०

  • आधार लिंक असणारी खाती - १९,७४,०८५

  • आधार लिंक नसलेली खाती - १०,०३,१६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com