महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 13 September 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. मिशन बिगिन अगेनमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट केला जात आहे. ही गोष्ट अजिबात सहन केली जाणार नाही. जे राजकारण करु पाहात आहेत, त्यांना करु द्या. सध्या मी शांत आहे, आज मी यावर काही बोलणार नाही. पण, महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे 10 मुद्दे

- माझ्यावर आरोप लावला जात आहे, की मुख्यमंत्री घराबाहेर निघत नाहीत. मात्र, व्हिडिओ परिषदेद्वारे मी सर्वत्र पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे
- सध्याच्या स्थितीत स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, तेव्हाच आपण आपल्या कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवू शकू.
- येणाऱ्या काळात घरोघरी जाऊन ५५ वर्षांच्या वरील लोकांच्या आरोग्याची माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये आमदार आणि खासदारांची मदत घेतली जाईल.
- मास्कच आपली सुरक्षा करु शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क नक्की वापरा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर निघा. 
- पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका, मुंबईत मास्क वापरण्यात शिथीलता दिसून येत आहे. हे कधीही खपवून घेतलं जाणार नाही.
-जगभरात दुसरी कोरोनाची लाट येताना दिसत आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन हटवला आहे. पण कडक कायदे केले आहेत. 
- जगावर आलेलं बहुतेक हे सर्वात भयंकर संकट आहे. त्याचा सामना आपण सर्वांनी मिळून करु. यात मला तुमची साथ हवी आहे.
- मी सर्वधर्मीय लोकांचे आभार मानतो. कारण, सणासुदीच्या दिवसातही लोकांनी आपला संयम पाळून कोरोना काळात सहकार्य केले आहे.
-पुनश्च हरीओम म्हणजे मिशन बिगिन अगेनला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. पुन्हा सर्वकाही सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.
- महाराष्ट्राची स्थिती खूप वाईट नाही. राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 points in the speech of the Chief Minister uddhav thackeray