'क्राईम शो पाहून 10 वर्षाच्या मुलाने बनवला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

'क्राईम शो पाहून 10 वर्षाच्या मुलाने बनवला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

चंद्रपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, शाळा बुडवल्या मुळे घरी आई मारेल या भितीने 10 वर्षाच्या मुलाने स्वतःचेच अपहारण झाल्याचा कट रचल्यांची घटना समोर आली आहे. टिव्ही वर 'क्राइम शो' पाहुन हे कृत्य केल्याची मुलाने कबुली दिली आहे, हे ऐकुन पोलीस ही चक्रावले आहेत.

चौकशीत मुलाने सांगितले की, त्याचे एका कार चालकाने अपहरण केले होते. कुठेतरी घेवून चालले असताना तेथून पळून जाऊन त्याने घर गाठले आणि आई-वडिलांना याची माहिती दिली. मुलाचे बोलणे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

मुलाने दिलेल्या महिती नुसार पोलिसांनी लगेच वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे स्वरूप यावर तपास सुरू केला. शहरातील सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले मात्र कोणताही सुगावा लागला नाही. त्या नंतर मुलाला विश्वासात घेवून विचारल असता त्याने सांगितल की आईच्या भितीने खोट बोललो.

हेही वाचा: आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री...अजित पवार गोंधळले,VIDEO

या घटने वर पोलीस अधिकारी महेश कोंडावार यांनी सांगितलेकी हा मुलगा सकाळी शाळेत चाललेला,त्याच वेळी एक पांढऱ्या रंगाची गाडी आली त्यातुन दोन माणसे उतरली आणि त्यांनी त्याला धरून जबरदस्तीने गाडीत बसवले.आणि काही अंतरावर गेल्यावर त्याने त्या गाडीतून बाहेर उडी मारली. आशी खोटी कहानी बनवुन या मुलाने पालकांन सह पोलीसांना सुध्दा गंडवल्याची समोर आले.

Web Title: 10 Year Old Boy Faked Own Kidnapping Watching Crime Show

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..