
जालना: आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात झाली आहे. अशातच पेपरफुटीची घटना समोर आली आहे. दहावीच्या मराठी पेपर जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूर मध्ये समोर आला आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.