11th Admission Merit List: अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २६ मे रोजी; राज्यभरात साडेसात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यातील ९,५८९ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; तात्पुरती व अंतिम गुणवत्ता यादी मे महिन्यात, तर पहिल्या कॅप फेरीची गुणवत्ता व कट-ऑफ २६ मे रोजी घोषित होणार
FYJC Admission 2026: First Merit List to be Released on May 26

FYJC Admission 2026: First Merit List to be Released on May 26

Sakal

Updated on

पुणे : राज्यातील नऊ हजार ५८९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत जवळपास सात लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरून नोंदणी केली आहे. अकरावीच्या प्रवेशाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी १४ आणि १५ मे दरम्यान, तर अंतिम गुणवत्ता यादी १८ आणि १९ मे दरम्यान जाहीर होणार आहे. तर पहिल्या नियमित कॅप फेरीची गुणवत्ता यादी, महाविद्यालय वाटप यादी, कट-ऑफ जाहीर २६ मे रोजी जाहीर होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com