Mahabaleshwar Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला! 'मिनी काश्मीर' महाबळेश्वर थंडीनं गारठलं

महाबळेश्वर पर्यटनस्थळी (Mahabaleshwar Tourism) सध्या थंडीचा (Winter Season) कडाका चांगलाच वाढला आहे.
Mahabaleshwar Tourism
Mahabaleshwar Tourismesakal
Summary

वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात शहरापेक्षा अधिक थंड वातावरण आहे. वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात सात ते आठ अंशापर्यंत पारा खाली उतरत आहे.

महाबळेश्वर : महाराष्ट्रातील थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलाबी थंडीच्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी (Mahabaleshwar Tourism) सध्या थंडीचा (Winter Season) कडाका चांगलाच वाढला आहे. शहरात सध्या १२ अंश, तर वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात सात ते आठ अंशापर्यंत पारा खाली जात असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गुलाबी थंडी व आल्हाददायक वातावरणात पर्यटक कानटोपी, शाल, स्वेटर, जॅकेट परिधान करून पर्यटनाचा व गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. वेण्णालेकसह लिंगमळा परिसरातील प्रत्येक हॉटेल व रेस्‍टॉरंटबाहेर अनेक जण थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार घेत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Mahabaleshwar Tourism
घरी निघालेल्या पालकमंत्र्यांच्या गाडीवर भिरकावली बाटली; पोवई नाक्यावर 100 पोलिस झाले गोळा, काय होतं बाटलीत?

नाताळ हंगामातील सुट्या व नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वरमध्‍ये पर्यटकांची (Tourists) गर्दी वाढत आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी महाबळेश्वरकरांसह हॉटेल व्यावसायिकही तयारीला लागले आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विद्युतरोषणाई, आकर्षक सजावटीत व्यस्त झाले आहेत.

अशातच काही दिवसांपासून शहरासह परिसरातील कडाक्याची थंडी महाबळेश्वरचे सौंदर्य खुलवत आहे. गुलाबी थंडीमध्ये पर्यटक पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. थंडीपासून बचावासाठी पर्यटक उबदार वस्त्रे परिधान करून मुख्य बाजारपेठेत सायंकाळी फेरफटका मारताना दिसत आहेत.

Mahabaleshwar Tourism
Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातली धोकादायक दरड हटवली, पण 'या' मार्गावर मोठी कोंडी

लवकरच हिमकणांचे सौंदर्य

वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात शहरापेक्षा अधिक थंड वातावरण आहे. वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात सात ते आठ अंशापर्यंत पारा खाली उतरत आहे. वेण्णालेक, लिंगमळा परिसरात पाण्याच्या साठ्यामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने दर वर्षी दवबिंदू पडण्यास सुरुवात होते.

त्या दवबिंदूवर प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर हिमकणात होते. हे हिमकण दर वर्षी वेण्णालेक नौकाविहाराच्‍या लोखंडी जेटी, वाहनांचे टप, परिसरातील घरांवरील छपरांवर, पाने, झाडे झुडपांवर पसरल्याचे पाहावयास मिळते. थंडीचा कडाका असाच राहून पारा घसरल्यास येत्या काही दिवसांत हे हिमकण नक्कीच पाहावयास मिळतील, असा अंदाज येथे व्यक्त केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com