esakal | राज्यातील 12 हजार कैदी पॅरोलवर; कारागृह महानिरीक्षकांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील 12 हजार कैदी पॅरोलवर; कारागृह महानिरीक्षकांची माहिती

राज्यातील 12 हजार कैदी पॅरोलवर; कारागृह महानिरीक्षकांची माहिती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : राज्यातील (maharashtra) बहुतांशी सर्वच कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे त्यांच्यात सोशल डिस्टन्सिंग (social distance) राहाणे शक्य नव्हते. राज्यातील १२ हजार कैद्यांना कोरोना पॅरोल रजेवर पाठवले आहेत. या कैद्यांना परत आल्यावर त्यांच्या शिक्षेचा काळ पूर्ण करावा लागणार आहे. राज्यात ५३ कैदी असे होते, त्यांनी या रजेवर जाण्यास नकार देऊन कारागृहातच राहणे पसंत केले. कारागृहात कोरोना (covid-19) प्रतिबंधक उपाययोजनांची जी अंमलबजावणी केली, त्याचे उच्च न्यायालयाने कौतुक केले, अशी माहिती कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद (sunil ramanand) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रामानंद यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कारागृहाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी उच्च न्यायालयाने हाय पावर समिती नेमली होती. यात उच्च न्यायालयाचे (high court) न्यायाधीश, कारागृह सचिव, कारागृह महानिरीक्षक यांचा समावेश होता. पहिल्यांदा राज्यातील कारागृहामधील १२ हजार कैद्यांना ताप्तुरत्या पॅरोल रजेवर पाठवले. राज्यात कैद्यांसाठी ४० कोविड सेंटर उभारली. कारागृहात कैदी कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्याच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जातात. येणाऱ्या कैद्याची कोरोना चाचणी करून त्याला १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेऊन कारागृहात प्रवेश दिला जातो.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात

राज्यातील ३३ हजार कैद्यांपैकी २४ हजार कैद्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित कैद्यांचे लसीकरण पुढील ३ महिन्यांत पूर्ण होईल. आत्तापर्यंत १० कारागृह कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कारागृहांत कोरोना नियंत्रणात आहे. या वेळी कळंबा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर उपस्थित होते.

कळंबा कारागृह लसीकरणात मागे

कळंबा कारागृहात सध्या दोन हजार कैदी आहेत. त्यातील ६०० जणांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. अद्याप १४०० जणांना पहिलाच डोस मिळालेला नाही. दुसरा डोस तर अद्याप एकाही कैद्याला मिळालेला नाही.

मुंबईत बहुमजली कारागृहाचा प्रस्ताव

मोठ्या शहरांत कारागृहांच्या विस्तारीकरणाला जागा नाही. त्यामुळे येथे बहुमजली कारागृहे बांधावीत, असा विचार आहे. यासाठी मुंबईत चेंबूरला बहुमजली कारागृहाचा प्रस्ताव दिला आहे. अशा प्रकारचे कारागृह शिकागो आणि मियामी येथे आहे, असे रामानंद यांनी सांगितले.

हेही वाचा: पृथ्वीचे आरोग्य समुद्रावर कसे अवलंबून? जाणून घ्या नेमकं कारण

कैद्यांचा कॅंटिन कोटा वाढला

पूर्वी कैद्यांना महिन्याला तीन हजारांची खरेदी कँटीनमधून करता येत होती. आता ही मर्यादा ४ हजारांपर्यंत वाढवली आहे. कैद्यांना त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी अधिक प्रमाणात घेता येतील, अशी माहिती रामानंद यांनी दिली.

loading image