

Voter Lists
sakal
नांदुरा - मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहे. त्यापैकी कोणताही एक मूळ पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही सांगण्यात आले आहे.