क्षयरोगमुक्तीसाठी 13 शहरांचा समावेश 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

मुंबई - "जीत' प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर व संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. या उपक्रमात खासगी रुग्णालये तसेच शासकीय आरोग्य संस्थाची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यातील 13 शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी येथे सांगितले. 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या "राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम' अंतर्गत "जीत' प्रकल्पाच्या उद्‌घाटन सोहळ्या प्रसंगी ते म्हणाले, ""मुंबईत दररोज सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करतात. त्यामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्‍यता जास्त असते. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून असे आढळून आले की, बहुतांश क्षयरुग्ण संपूर्ण उपचार घेत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढतो व परिणामी रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते.'' 

""केंद्र सरकारच्या मध्यवर्ती क्षयरोग विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून असे आढळून आले की, 60 टक्के क्षयरुग्ण खासगी क्षेत्रात उपचार घेतात. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे उपचार घेणाऱ्या अशा क्षयरुग्णांची माहिती जमा करून त्यांना उपचाराच्या कक्षेत आणण्यासाठी "जीत' प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्याद्वारे 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत असे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. 

उपक्रमांतर्गत 23 जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम 
"जीत' उपक्रम महाराष्ट्रातील प्रमुख 13 शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यात औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, रायगड, सोलापूर, ठाणे, विरार, वसई- भाईंदर, डोंबिवली व भिवंडी यांचा समावेश आहे. या प्रकल्पात 350 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत 23 जिल्ह्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 cities to be included For free for Tuberculosis