मध्य रेल्वे द्वारे महापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ विशेष गाड्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Railway

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Central Railway : मध्य रेल्वे द्वारे महापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ विशेष गाड्या!

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये नागपूर ते सीएसएमटी 3, सीएसएमटी मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर 6, कलबुर्गी ते सीएसएमटी 2 गाड्या धावतील. सोलापूर आणि सीएसएमटी आणि एक विशेष गाडी अजनी ते सीएसएमटीपर्यंत धावणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01262 नागपूरहून 4 डिसेंबर 2022 रोजी रात्री 11.55 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01264 विशेष गाडी 5 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता सीएसएमटी पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01266 विशेष गाडी 5 डिसेंबर 2022 रोजी नागपूरहून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि सीएसएमटी दुसऱ्या दिवशी सकाळी 10.55 वाजता पोहोचेल.

ट्रेन गाडी क्रमांक 01249 सीएसएमटी येथून 6 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 4.45 वाजता सुटेल आणि अजनीला दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01251 सीएसएमटी मुंबई येथून 6 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01253 दादरहुन 7 डिसेंबर 2022 रोजी मध्य रात्री 12.40 वाजता (6/7 डिसेंबर 2022 रोजी मध्यरात्री) सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.55 वाजता अजनीला पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01255 सीएसएमटी मुंबई येथून 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्य रात्री 3 वाजता नागपूरला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01257 सीएसएमटी येथून 8 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.10 वाजता नागपूरला पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01259 दादर 8 डिसेंबर 2022 रोजी (7/8 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री) रात्री 12.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.55 वाजता अजनीला पोहोचेल. तसेच कलबुर्गी-मुंबई अनारक्षित विशेष 2, सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष 2 आणि अजनी-मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित विशेष 1 गाडी धावणार आहे.