कलिंगडाच्या बिया फेकू नका, घरांच्या भेगा बुजविण्यासाठी होणार वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

watermelon

कलिंगडाच्या बिया फेकू नका, घरांच्या भेगा बुजविण्यासाठी होणार वापर

नागपूर : आपले घर नेहमीच मजबूत राहावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्नरत असतो. मात्र, काही विशिष्ट काळानंतर घराच्या भिंतींना वातावरण आणि इतर कारणांनी तडे जातात. त्यामुळे अनेकदा त्याचा खर्चही अधिक असतो. मात्र, विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या (VNIT) सहयोगी प्राध्यापिका यांनी चक्क कलिंगडाच्या बियांचा (watermelon seeds) वापर करीत मिश्रण तयार केले. या मिश्रणाचा वापर भिंतींना येणारे तडे आणि भेगा बुजविण्यासाठी करता येणार आहे. (watermelon seeds will use for home re construction in nagpur)

व्हीएनआयटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापिका व संशोधक डॉ. मधुवंती लाटकर

व्हीएनआयटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापिका व संशोधक डॉ. मधुवंती लाटकर

संशोधक डॉ. मधुवंती लाटकर यांनी केलेले संशोधन

संशोधक डॉ. मधुवंती लाटकर यांनी केलेले संशोधन

व्हीएनआयटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापिका व संशोधक डॉ. मधुवंती लाटकर यांनी ‘नीरी‘चे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनात बांधकामात बायोसिमेंटेशनचा उपयोग कसा करता येईल यावर संशोधनास सुरुवात केली. त्यांनी संशोधनात कलिंगडाच्या बियांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या संशोधनात सामान्य सिमेंट कॉंक्रिटपेक्षा कलिंगडाच्या बिया वापरून तयार केलेल्या बायोसिमेंटेड मिश्रणात २२ टक्के दाबशक्ती वाढली आणि १९ टक्के पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी झाल्याचे दिसून आल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झाले. याशिवाय बायोसिमेंटेशनचे महत्त्वही त्यातून दिसून आले. त्यामुळे कलिंगडाच्या चकत्या आणि बियाणे न फेकता वापर करता येणे शक्य झाले आहे. यासाठी त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनी स्निग्धा भुतांगे यांनी सांख्यिकीय विश्वसनीयता दाखवून दिली. त्यामुळे येत्या काळात बायोसिमेंटेशनचा उपयोग करीत, त्यातून मजबूत बांधकाम आणि भेगा दुरुस्त करता येणे शक्य होईल.

...तर संशोधन ठरणार वरदान -

बांधकाम व्यवसायात होणाऱ्या रासायनिक साहित्याच्या वापराने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होताना दिसून येते. त्यामुळे या साहित्याचा वापर कमी करण्यासाठी बायोसिमेंटेशनचा उपयोग करीत, त्याद्वारे प्रत्यक्ष घर वा इमारत तयार करण्यासाठी ही पद्धत वापरल्यास त्यात कितपत यश मिळते, हे तपासण्यात येणार आहे. तो प्रयोग यशस्वी झाल्यास बांधकामासाठी हे संशोधन वरदान ठरणार आहे.

टॅग्स :Nagpur