
तात्या लांडगे
सोलापूर : पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी एकादशीचा सोहळा ६ जुलै रोजी पंढरपुरात रंगणार आहे. यंदाच्या वारीसाठी अंदाजे १६ लाखांहून अधिक भाविक पंढरीत येतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. गर्दीवरील नियंत्रणासाठी दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त त्याठिकाणी असणार आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण, आंध्रप्रदेश यासह अनेक राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी, भाविक पंढरपुरात येतात. गतवर्षी १४ ते १५ लाख भाविक आले होते. त्यावेळी पंढरपूर शहरातील गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांना खूप मोठी मेहनत घ्यावी लागली होती. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या कार्यकाळातील आषाढीची पहिलीच वारी आहे. ५ व ६ जुलैला पंढरपूर शहरात वारकऱ्यांची संख्या खूप मोठी राहते. गर्दीवर नियंत्रण करून वारी यशस्वी करण्यासाठी राज्यभरातील काही प्रमाणात पोलिस बंदोबस्तासाठी असणार आहेत.
गतवर्षी अधिकारी व पोलिस अंमलदारांची संख्या चार हजार ८५० पर्यंत होती. पण यंदा वारकरी मोठ्या संख्येने येण्याचा अंदाज असल्याने एकूण सहा हजार पोलिस अंमलदार व अधिकारी बंदोबस्तासाठी असणार आहेत. याशिवाय त्यांच्या मदतीला तीन हजार २०० होमगार्ड देखील असतील. तसेच राज्य राखीव पोलिस बलाच्या सहा कंपन्या देखील पंढरपुरात असणार आहेत. याशिवाय गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचे ड्रोन देखील असणार आहेत.
असा असणार पोलिस बंदोबस्त
पोलिस अंमलदार
५,४५०
होमगार्ड
३,२००
पोलिस अधिकारी
५४५
‘एसआरपीएफ’ तुकड्या
६ कंपन्या
पोलिस, आरटीओची यंत्रणा एकत्र
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी त्यांच्या गावापासून पायी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. महामार्गावर त्यांचा प्रवास असतो. अनेकदा अपघात देखील झाले असून त्यात काहींना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर अपघातमुक्त वारीसाठी यंदा आरटीओची पथके व सोलापूर ग्रामीण पोलिसांची पथके वेगवेगळ्या मार्गांवर कार्यरत असणार आहेत. वारकऱ्यांचे प्रबोधन व वाहतुकीचे नियमन ही पथके वारी काळात करणार असून तसे नियोजन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व आरटीओ गजानन नेरपगार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.