esakal | सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर 160 पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती ! 15 दिवसांचा 'इंडक्‍शन कोर्स' बंधनकारक

बोलून बातमी शोधा

0Police_17.jpg}

15 दिवसांचा 'इंडक्‍शन कोर्स' बंधनकारक 
पोलिस हवालदार आणि सहायक पोलिस उपनिरीक्षकपदावरून पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा 'इंडक्‍शन कोर्स' बंधनकारक करण्यात आला आहे. अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) यांच्या वतीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तत्पूर्वी, ज्या पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नतीवर ज्या ठिकाणी नियुक्‍ती झाली आहे. त्याठिकाणी जाऊन त्यांनी तत्काळ पदभार स्वीकारावा आणि त्याचा अहवाल पाठवावा, असे निर्देशही गृह विभागाने दिले आहेत. पदोन्नतीवरील पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी म्हणून काम करताना कामकाजाची माहिती व्हावी, या हेतूने काही दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वास्तविक पाहता 'पीएसआय' झालेल्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण करावे लागते. परंतु, या टप्प्यातील बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून कोरोनाचाही संसर्ग वाढू लागल्याने काही दिवसांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचेही बोलले जात आहे. 

maharashtra
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर 160 पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती ! 15 दिवसांचा 'इंडक्‍शन कोर्स' बंधनकारक
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : विभागीय पात्रता परीक्षा 2013 मध्ये होऊनही पदोन्नतीच्या प्रतीक्षेतील पोलिस हवालदार आणि सहायक पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्याचा निर्णय आज गृह विभागाने घेतला. त्यात सोलापूर शहर-जिल्ह्यातील चौघांचा समावेश असून 131 पोलिस हवालदार तर 29 सहायक पोलिस उपनिरीक्षकांचाही त्यामध्ये समावेश आहे.

15 दिवसांचा 'इंडक्‍शन कोर्स' बंधनकारक 
पोलिस हवालदार आणि सहायक पोलिस उपनिरीक्षकपदावरून पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा 'इंडक्‍शन कोर्स' बंधनकारक करण्यात आला आहे. अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) यांच्या वतीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तत्पूर्वी, ज्या पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नतीवर ज्या ठिकाणी नियुक्‍ती झाली आहे. त्याठिकाणी जाऊन त्यांनी तत्काळ पदभार स्वीकारावा आणि त्याचा अहवाल पाठवावा, असे निर्देशही गृह विभागाने दिले आहेत. पदोन्नतीवरील पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी म्हणून काम करताना कामकाजाची माहिती व्हावी, या हेतूने काही दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वास्तविक पाहता 'पीएसआय' झालेल्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण करावे लागते. परंतु, या टप्प्यातील बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून कोरोनाचाही संसर्ग वाढू लागल्याने काही दिवसांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचेही बोलले जात आहे. 

पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना ज्यांचे वय 50 पेक्षा अधिक आहे, अथवा ज्यांना सेवानिवृत्तीसाठी दोन-पाच वर्षे कमी आहेत. त्यांना त्याच शहरात तथा जिल्ह्यात पदोन्नती देण्यात आली आहे. या वयात त्यांच्या मुलांचे शिक्षण, विवाह, राहण्याची गैरसोय, निवासस्थानाचा प्रश्‍न निर्माण होईल आणि राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप दूर न झाल्याने तसा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर ग्रामीणमधील सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रविण जाधव यांची कोल्हापूर परिश्रेत्र येथे तर पोलिस हवालदार झाकीरहुसेन शेख व शांताराम जाधव यांना शहरातून पोलिस प्रशिक्षण केंद्रात आणि राजेश जाधव यांना कोल्हापूर परिश्रेत्रात पदोन्नतीवर नियुक्‍ती देण्यात आली आहे. लोकमार्ग मुंबई, पुणे, ठाणे शहर, नवीमुंबई, नांदेड, कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली परिश्रेत्र आणि औरंगाबाद शहर याठिकाणी 160 पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्या आहेत.

पदोन्नतीमध्ये यांचा समावेश... (कंसात सध्याचे ठिकाण) 
रमेश लासिनकर, रविंद्रनाथ दिपक, तुलसिदास फुलपगार, लक्ष्मण मुरकुटे, मंचक फड, राजेश जाधव (परभणी), मनोहर हिवाळे (बुलढाणा), राजेश देशमाने (पालघर), कृष्णा पवार (नंदूरबार), कैलास दामोदर (धुळे), राजाराम तळावडेकर, संतोष दोडकडे, संजय पुजारी, राजेंद्र शिंदे, रामचंद्र दड्डेकर, धर्मराज सोनवणे, प्रकाश गार्डी, वसंत शिंत्रे, प्रकाश राणे, दिपक राणे, संजय भाट, आनंद साळवे, मोहन भिलारे, कैलास झोडगे, मनोहर पवार, सतीश पालांडे, शिवाजी पाटील, प्रताप मोहिते, रविंद्र कदम, रविंद्रनाथ कदम, गौतम काकडे, मानसिंग खबाळे, सुरेश गोसावी, चंद्रकांत भालेराव, रमेशकुमार पांडे, श्रीरंग सावर्डे, रमेश देशमुख, विनोद विचारे, संदीप यादव, सुखदेव नागरे, धनंजय डुबल, भालचंद्र पवार, राजकुमार सरजीने, संजय कदम, महेश खेतले, प्रमोद पांचाळ, प्रभाकर परब, अनंत कदम, प्रल्हाद नाईक, राजू पोटे, शशिकांत कदम, संजय पाटील, रविंद्रकुमार राऊत, रविंद्र मोराडे, किशोर मर्चंडे, सुनिल गोयथळे, राजेंद्र बागल, कैलास चव्हाण, नंदकिशोर सरफरे, विश्‍वास केदारे, अरविंद आंबवले, रोहिदास गवस, मनोज कदम, राजेंद्र पवार, विजय महाडीक, अनिल सावंत, संदीप मोरे, अरुण जाधव, दिलीपकुमार राजपूत, हॅन्नी पिंटो, अनिल झेंडे, विलास पानसरे, संदीप शिंदे, उत्तम शिंदे, जितेंद्र गोळे, शांतराम घुगे, दिपक घाग, राजेंद्र शिंदे, विष्णू शिंदे, उदय वालेकर, सतिश जाधव, दादासाहेब गोसावी, अरुण पगारे, सलीम सय्यद, सतिश चव्हाण, तुळशिराम पवार, महेश सावंत, राजेंद्र शिंदे, देविदास पवार, दत्तात्रय मोतिराम दळवी, सादीक शेख, कैलास राठोड, अनिल होळकर, संजयकुमार कांबळी, अनिल भोसले शैलेश शिंदे, राजेंद्रकुमार पाटील (मुंबई शहर), प्रल्हाद तांबे (औरंगाबाद ग्रामीण), बळनाथ बोडखे, रमाकांत गायकवाड (नाशिक शहर), देवराज भांडेकर (गडचिरोली), शिवराज पवार (यवतमाळ), चंद्रकांत बागेवाडी (पुणे ग्रामीण), तमीज मुल्ला, घनशाम बांदेकर, जयंत पाठक, गंगाधर जायभाये, तानाजी पाटोळे, रामेश्‍वर ढिकळे, शंकर परदेशी, दिपक महांगडे, जगदीश मोकळ, प्रकाश चौगुले, अशोक होळकर, श्रीकृष्ण चव्हाण, प्रदीपसिंग परदेशी, संजय नष्टे, दिपक शिंदे (लोहमार्ग मुंबई), प्रमोद कुलकर्णी, अब्दुल पटेल (लोहमार्ग पुणे), रफी अहमद, सय्यद मोहम्मदअली (औरंगाबाद शहर), प्रभुदास निकोसे (भंडारा), विलास माने, रविंद्र निकुंभ, गोरखनाथ घाडगे, सुरेश मोहिते (नवी मुंबई), विनोद कदम, रमेश जाधव, सुधीर गांगुर्डे (ठाणे शहर), दिलीप वानखेडे (लोहमार्ग नागपूर), संजय साळुंके (लोहमार्ग औरंगाबाद), ब्रिजकिशोर तिवारी (गोंदिया), सलीम शेख (पुणे शहर) अशा 160 जणांचा पदोन्नतीमध्ये समावेश आहे.