उजनीतून भीमा नदीमध्ये सोडले 16 हजार 600 क्‍युसेकने पाणी

संतोष सिरसट
Tuesday, 13 October 2020

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची स्थिती (क्‍युसेकमध्ये) 
मुख्य कालवा ः 1000 
विद्युत निर्मिती ः 1600 
बोगदा ः 200 
भीमा नदी ः 15000 
(आज सकाळी सहापर्यंतची स्थिती) 

 

सोलापूर ः जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरण परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. धरण यापूर्वी 100 टक्‍के भरलेले आहे. त्यातच आता परतीचा पाऊस धरण परिसरात पडत आहे. त्यामुळे धरणातून भीमा नदीमध्ये 16 हजार 600 क्‍सुसेकने पाणी सोडण्यातस सुरवात केली आहे. 

उजनी धरणातून यापूर्वीही जवळपास 30 ते 35 टीएमसी पाणी भीमा नदी, कालवा व बोगद्याच्या माध्यमातून सोडण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात धरण शंभर टक्के भरल्यापासून धरणातून पाणी सोडणे सुरु केले होते. त्यानंतर मागील महिन्यात पावसाने थोडीशी उसंत दिल्यानंतर धरणातून नदीमध्ये, कालव्यामध्ये सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले होते. ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात व धरण परिसरात पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे साहजिकच धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. एका ठरावीक मर्यादेनंतर धरणातून भीमा नदी, कालवा व बोगद्याच्या माध्यमातून पाणी सोडण्याचे नियोजन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने करण्यात येते. त्यानुसार आता धरणातून पाणी सोड्यण्यास सुरवात केली आहे. धरणातून भीमा नदीमध्ये सोमवारपासून पाणी सोडण्यास सुरवात केली आहे. सोमवारी 20 हजार क्‍युसेकने पाणी सोडले होते. आज त्यामध्ये थोडीशी घट करुन ते 16 हजार 600 क्‍युसेकने सोडले जात आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी भीमा नदीमध्ये सोडले जाण्याची शक्‍यता आहे. 

धरणात येणारे पाणी (क्‍युसेकमध्ये) 
बंडगार्डन येथून ः 4975 
दौंड येथून ः 3882 
(आज सकाळी सहापर्यंतची स्थिती) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16,600 cusecs of water released into the Bhima river from Ujani dam