
धुळे : येथील शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये एक कोटी ८४ लाख रुपयांची रोकड आढळल्याने एकच खळबळ उडाली. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीतील आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी जमा केलेले कोट्यवधी रुपये शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील खोली नंबर १०२ मध्ये ठेवल्याचा आरोप शिवसेना (उद्वव बाळासाहेब ठाकरे) नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. त्यानंतर उशिरा पोलिसांनी केलेल्या तपासणीत रोख रक्कम आढळलीa बुधवारची रात्र धुळ्यात नाट्यमय घडामोडींची ठरली. जिल्ह्यातील एकूणच प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली गेल्याची चर्चाही रंगली होती.