बार्शी तालुक्यात 3 दिवसांत 2 घटना! पोलिस असल्याचे सांगून पतीची वाट पाहत थांबलेल्या नवविवाहितेचे दागिने लंपास; माजी सैनिकाच्या पत्नीचेही ३ लाखांचे दागिने लंपास

'आम्ही पोलिस आहोत, पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे', असे सांगत दोन तरुणांनी सेवानिवृत्त सैनिकाच्या पत्नीला व नवविवाहिता अशा दोघींचे सुमारे चार तोळ्यांचे दागिने लंपास केले. याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यात तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
gold
goldesakal
Updated on

वैराग : ‘आम्ही पोलिस आहोत, पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे’, असे सांगत दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी सेवानिवृत्त सैनिकाच्या पत्नीला शुक्रवारी आणि पतीची वाट पाहत थांबलेल्या नवविवाहितेला रविवारी फसविले. त्या दोघींकडील सुमारे चार तोळ्यांचे दागिने तीन दिवसात त्या दुचाकीस्वारांनी लंपास केले आहेत. याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यात तीन दिवसांतील ही दुसरी घटना असल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मनीषा भवरकर (वय ४०, जामगाव आवटे, ता. बार्शी) यांनी दोन तरुणांविरोधात फिर्याद दाखल केली. ही दुसरी घटना रविवारी (ता. २२) जामगाव आवटे येथे दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. पहिली घटना शुक्रवारी (ता. २०) याच मार्गावर घडली होती.

मनीषा भवरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मुलगी आदिती नवविवाहित असून, आज तिचे पती नेण्यासाठी येणार होते. आम्ही दोघी बाह्यवळण रस्त्यावर घराजवळ असलेल्या माऊली नर्सरी येथे गुलाबाची रोपे घेऊन पायी येत होतो. त्यावेळी दोन तरुण दुचाकीवरून आले आणि ‘आम्ही पोलिस आहोत, पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे, तुमच्याकडील दागिने काढून आमच्याकडे द्या, पदरात सोने ठेवू नका’, अशी बतावणी केली. त्यांचे सांगणे खरे समजून आदितीच्या गळ्यातील १२ ग्रॅमचे मिनीगंठण तिने माझ्याकडे दिले होते.

पदरात गाठ बांधून ठेवलेले काढायला लावले व खिशातून कागद काढून त्याची पुडी बांधली व आमच्याकडे दिली. घरी जाईपर्यंत उघडू नका, असे सांगितले. घरी गेल्यावर पुडीत पाहिले असता त्यात एक नकली अंगठी ठेवलेली दिसली. त्या तरूणांनी आमची फसवणूक केल्याचे मनीषा भवरकर यांनी पोलिसांना सांगितले.

शुक्रवारी वृद्ध महिलेलाही असेच फसविले होते

असाच प्रकार शहरातील ज्येष्ठ सेवानिवृत्त सैनिक पत्नीसह धानोरे (ता. बार्शी) येथे घडली आहे. यमाई देवीचे दर्शन घेऊन दुचाकीवरून परतताना हॉटेलजवळ थांबले असताना दोघांनी येऊन पोलिस असल्याचे सांगत तीन तोळ्यांच्या दोन पाटल्या व चार ग्रॅमची अंगठी, असा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. सेवानिवृत्त सैनिक शंकर कुलकर्णी (वय ७०, रा. भिसे प्लॉट, सुभाषनगर, बार्शी) यांनी दोघांविरोधात फिर्याद दिली होती. ही घटना शुक्रवारी (ता. २०) जामगाव आवटे (ता. बार्शी) येथे सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली होती. पोलिस त्या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com