कुठे गेले ते २० लाख कोटी? - सत्यजित तांबे

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 12 August 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून छोटे, लघु व मध्यम उद्योजकांना काहीच मिळाले नसून, हे पॅकेज म्हणजे केवळ पोकळ घोषणा होती, हे स्पष्ट झाले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितले.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून छोटे, लघु व मध्यम उद्योजकांना काहीच मिळाले नसून, हे पॅकेज म्हणजे केवळ पोकळ घोषणा होती, हे स्पष्ट झाले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तांबे यांच्या संकल्पनेतून, कुठे गेले ते २० लाख कोटी? या राज्यव्यापी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लघू व मध्यम उद्योगातील व्यावसायिकांशी संवाद साधला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन छोटे व्यापारी व उद्योजकांशी संवाद साधला. तांबे म्हणाले, ‘‘जीएसटीमध्ये सूट न मिळाल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये कर्जाची सोय केलेली आहे, ते कर्ज व्याजासकट परत करायचे आहे, मग ही मदत कशी? कोणत्याही व्यापाऱ्याला कोणत्याही प्रकारचे अर्थसाहाय्य मिळालेले नाही. मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे, असा नाराजीचा सूर उद्योजकांमध्ये आहे.’

११ वीसाठी निवडा आवडीचं महाविद्यालय; बुधवारपासून सुरू होणार दुसरा टप्पा!

सरकारने आर्थिक मदत व जीएसटीमध्ये सवलत देणे गरजेचे होते. तीसुद्धा दिलेली नाही. शेतकऱ्यांप्रमाणेच लघु व मध्यम उद्योजकांच्या तोंडाला या पॅकेजने पाने पुसली असून, २० लाख कोटींचे पॅकेज हे जुमलाच होता. हे आता सिद्ध झाले आहे. 
- सत्यजीत तांबे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 lakh crore where it has gone satyajeet tambe