मोदींच्या योजनेतून २० टन सोने जमा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 19 May 2020

देशाचा नागरिक म्हणून पंतप्रधानांना सल्ला देण्याचा अधिकार आहे. धार्मिक स्थळांकडून सोने कर्ज रूपाने घ्यावे; त्यावर व्याज द्यावे, असा सल्ला दिला होता. धार्मिक स्थळांकडून सक्ती करून किंवा हिसकावून घ्या असे म्हटलेच नाही.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

मुंबई - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गोल्ड मॉनिटायझिंग’ म्हणून एक योजना आणली होती. अजूनही ती योजना सुरू आहे. या योजनेमार्फत साडेवीस टन सोने गोळा झालेले आहे,’’ अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

‘‘कोरोनाच्या लढ्यासाठी निधी उभारण्यासाठी मंदिरे आणि धार्मिक स्थळांचे सोने घेण्याचा उल्लेख मी केला होता. धार्मिक स्थळ म्हणजे फक्त हिंदू धर्माची मंदिरे अशी मानसिकता निर्माण झालेली आहे. माझ्या ट्विटमध्ये मी अगदी स्पष्टपणे सांगितले होते; मात्र त्याचा राजकीय विपर्यास केला गेला, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले. 

पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करणारे आचार्य तुषार भोसले कोण आहेत? वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये ‘गोल्ड मॉनिटायझिंग’ योजना आणली होती. या योजनेमार्फत साडेवीस टन सोने गोळा झालेले आहे. मग मी सल्ला दिला म्हणून त्यामध्ये एवढा गदारोळ करण्याचे काय कारण आहे, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

देशाचा नागरिक म्हणून पंतप्रधानांना सल्ला देण्याचा अधिकार आहे. धार्मिक स्थळांकडून सोने कर्ज रूपाने घ्यावे; त्यावर व्याज द्यावे, असा सल्ला दिला होता. धार्मिक स्थळांकडून सक्ती करून किंवा हिसकावून घ्या असे म्हटलेच नाही.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 tons of gold collected from Modis scheme