
Malegaon Blast Case: मालेगाव येथील 2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाने आज एक ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या प्रकरणातील सातही आरोपी, ज्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे, यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. गेल्या 17 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.