पंढरपूर - आषाढी यात्रेच्या महासोहळ्याला आजपासून सुरवात झाली आहे. आषाढी वारीसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी शुक्रवारपासून (ता. २७) श्री विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. प्रक्षाळपूजेपर्यंत भाविकांसाठी विठ्ठल मंदिर रात्रंदिवस खुले राहणार आहे.