पहिली ते बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम कपात; शिक्षण विभागाने काढला अध्यादेश

तेजस वाघमारे - सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 July 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षण ऑनलाइल सुरू केले आहे. परंतु शाळा कधी सुरू करणार याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. यामुळे पहिली व बारावीच्या विद्यार्थ्यांचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. याबाबतचा अध्यादेश शिक्षण विभागाने काढला आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षण ऑनलाइल सुरू केले आहे. परंतु शाळा कधी सुरू करणार याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. यामुळे पहिली व बारावीच्या विद्यार्थ्यांचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. याबाबतचा अध्यादेश शिक्षण विभागाने काढला आहे.

मुंबईतील 'रेल्वे सेवा' कधी सुरु होणार? आता मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर...

कोरोनामुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. केंद्र सरकारने आगामी शैक्षणिक वर्षांत शालेय अभ्यासक्रमात आणि शाळांमधील तासिकांमध्ये कपात करण्याची सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली होती. तसेच राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही याबाबत स्पष्ट संकेत दिले होते. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) व केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड यांना जून महिन्यात दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात एक समान आशय असलेला भाग रद्द करावा, असा प्रस्ताव शिक्षण तज्ज्ञांनी सरकारसमोर मांडला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात कपात करून नवीन शैक्षणिक सत्रांचा 2020-21 अभ्यासक्रम तयार करणार आहे. केंद्रा प्रमाणेच यानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयारी सुरू केली आहे. विविध विषयांच्या अभ्यास मंडळ सदस्यांना त्यांनी अभ्यासक्रम कपात करून देण्यास सांगितले आहे. यानुसार अनेक अभ्यास मंडळांनी याबाबतचा आपला अहवाल परिषदेकडे सुपूर्द केले आहे. यानुसार 25 टक्के अभ्यासक्रम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिसांनो काळजी घ्या! कोरोनामुळे 24 तासांता एवढ्या योद्ध्यांचा मृत्यू

परिषदेच्या संकेतस्थळावर कमी झालेला अभ्यासक्रम
शिक्षण विभागाने 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यास परवानगी दिली आहे. तसेच कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. तसेच शाळांना व पालकांना याबाबत माहिती द्यावी, अशी सूचना ही अध्यादेशाद्वारे केली आहे.

------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 per cent curriculum reduction from 1st to 12th; Ordinance issued by the Department of Education

टॉपिकस