मुंबई - ‘काहीजण रोज मतचोरी झाल्याचे म्हणतात. मतचोरी नाही तर यांचेच डोके चोरीला गेले आहे. बहिणींना विनंती आहे की, यांना अक्कल यावी यासाठी अशा निर्बुद्धांसाठी २५ टक्के आशीर्वाद मागा. लाडक्या बहिणींच्या मतांना जर हे चोरी म्हणत असतील, तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण असतील,’ असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला केला.