
अकरावी प्रवेश प्रक्रियेत पाच शहरांतील कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग आहे. त्यात प्रवेशासाठी जुलैपासून प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत पहिल्या यादीतील १३ हजार ४५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवले. मात्र, यानंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलनास सुरुवात झाली.
नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत घेण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह'ची दुसरी फेरी काल संपली. मात्र, यावर्षी राज्यात १ लाख ७७ हजार १९८ जागा रिक्त असल्याचे चित्र दिसून आले आहे. अकरावीतील ५ लाख ४३ हजार ७८५ जागांसाठी या वर्षी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश देण्यात आले. त्या माध्यमातून ३ लाख ६६ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला.
हेही वाचा - 'राज्यपाल भाजप कार्यकर्ते अन् राजभवन पक्षाचे...
अकरावी प्रवेश प्रक्रियेत पाच शहरांतील कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग आहे. त्यात प्रवेशासाठी जुलैपासून प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत पहिल्या यादीतील १३ हजार ४५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवले. मात्र, यानंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलनास सुरुवात झाली. त्यामुळे राज्य सरकारने अकरावीच्या प्रवेशास तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली. तब्बल दोन महिने प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होता. मात्र, पुन्हा अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ डिसेंबर ते ३० जानेवारीदरम्यान घेण्यात आली. मात्र, त्यानंतरही जागा रिक्त असल्याने विभागाने शेवटची 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह' फेरी ५ ते १६ फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आली. यामध्ये मंगळवारपर्यंत (ता. १६) लाख ६६ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. आता प्रवेशप्रक्रिया बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी संपूर्ण राज्यात १ लाख ७७ हजार १९८ जागा रिक्त असल्याचे चित्र दिसून आले आहे.
हेही वाचा - यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?
विभागनिहाय आकडेवारी -
विभाग | एकूण जागा | प्रवेश घेतलेले विद्यार्थी | रिक्त जागा |
नागपूर | ५९,२५० | ३४,७९९ (८८.४४ टक्के) | २४,४५१ (४१.२ टक्के) |
मुंबई | ३,२०,७५० | २,२३,६५१ (८६.० २ टक्के) | ९७,०९९ (३०.२७ टक्के) |
पुणे | १,०७,०९५ | ७१,५५४ (८१.९ टक्के) | ३५,५४१ (३३.१९ टक्के) |
औरंगाबाद | ३१४७० | १६,९३३ (७७.७६ टक्के) | १४,५३७ (४६.१९ टक्के) |
नाशिक | २५,२७० | १९,७०० (७३.२७ टक्के) | ५,५७० (२२.०४ टक्के) |