road accident
road accidentsakal

अतिवेगाने साडेतीन वर्षांत ३३ हजार मृत्यू! दरवर्षी २.२५ कोटी वाहनचालकांकडून नियम पायदळी

शिवसंग्रमाचे अध्यक्ष विनायक मेटे व उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर ‘वाहनांचा वेग’ हे वाढते अपघात आणि मृत्यूचे प्रमुख कारण समोर आले आहे. साडेतीन वर्षांत अतिवेगाने ७६ हजार अपघातांमध्ये तब्बल ३३ हजार ६०४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

सोलापूर : शिवसंग्रमाचे अध्यक्ष विनायक मेटे व उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर ‘वाहनांचा वेग’ हे वाढते अपघात आणि मृत्यूचे प्रमुख कारण समोर आले आहे. साडेतीन वर्षांत अतिवेगाने ७६ हजार अपघातांमध्ये तब्बल ३३ हजार ६०४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

अहमदाबाद-मुंबई, नाशिक-पुणे, औरंगाबाद-नागपूर, सोलापूर-पुणे, मुंबई-गोवा, पुणे-मुंबई यासह इतर काही महामार्गांवर अपघातांचे प्रमाण अधिक असून नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती व कोकण या विभागांमध्ये अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण खूप मोठे आहे. चार-सहापदरी महामार्ग असतानाही अपघात आणि मृत्यू वाढले, हे विशेष. दरम्यान, महामार्गांवरील विनाहेल्मेट दुचाकीस्वार, वाहनांचा अतिवेग, लेनकटिंग, सिटबेल्ट नाही, धोकादायक माल तथा प्रवासी वाहतूक, अशा प्रमुख कारणांमुळे अपघाती मृत्यू वाढल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदविले आहे. २०१९ च्या तुलनेत मागील दीड वर्षांत अपघातांचे प्रमाण जवळपास आठ टक्क्यांनी वाढले आहे. दुसरीकडे २०१९-२० च्या तुलनेत अतिवेगाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सतराशेने वाढली आहे. दरवर्षी तब्बल सव्वादोन कोटी वाहनचालक वाहतूक नियम मोडतात. त्यात सिटबेल्ट, हेल्मेट नाही, लेनकटिंग (स्वत:ची लाईन सोडून दुसऱ्याच लाईनवरून वाहन चालवणे), अतिवेग आणि क्षमतेपेक्षा अधिक माल व प्रवासी, अशा वाहनचालकांचा समावेश असल्याचेही महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, अपघातानंतर अजूनही जखमींना वेळेत मदत मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. वाहनचालकांना पोलिसांची भीती वाटत असल्याने जखमींना अजूनही वेळेत मदत मिळत नाही आणि त्यामुळेही अनेकांचा मृत्यू झाला आहे.

अतिवेगाचे अपघाती बळी

सन अपघात मृत्यू

२०१९ २०,०४५ ८,१७५

२०२० १९,४१९ ९,१५२

२०२१ २०,८६० ९,८२९

२०२२ १५,८२२ ६,४४८

एकूण ७६,१४६ ३३,६०४

दरवर्षी ८०० कोटींची दंडवसुली

महामार्गांवर ब्लॅकस्पॉट वाढूनही आणि अपघातातील जखमींना तत्काळ दवाखान्यात पोहचविणारी यंत्रणा अपुरी असतानाही अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. महामार्गांवरील मदत केंद्रे नावालाच राहिली आहेत. राज्यात रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूमध्ये दरवर्षी मोठी वाढ होऊ लागली आहे. दरवर्षी महामार्ग पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांना सरासरी आठशे कोटींचा दंड केला जात आहे. जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२२ या काळात तब्बल चार कोटी वाहनांनी वाहतूक नियम मोडले आहेत. त्यात ४९ लाख विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा, १९ लाख अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांचा, दहा लाख सिटबेल्ट न घातलेल्यांसह लेनकटिंग व धोकादायक वाहतूक करणाऱ्यांचाही समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.