Navy Recruitment of Women : नौदलाच्या नियमात मोठा बदल, 341 महिलांची नियुक्ती, प्रत्येक शाखेत दिसणार महिला अधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navy Recruitment of Women

Navy Recruitment of Women : नौदलाच्या नियमात मोठा बदल, 341 महिलांची नियुक्ती, प्रत्येक शाखेत दिसणार महिला अधिकारी

Navy Recruitment of Women : नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच नौदलात महिलांचा समावेश केला आहे. अग्निवीर योजनेंतर्गत नौदलात 341 महिलांची भरती करण्यात आल्या आहे. महिला अधिकाऱ्यांनाही पुढील वर्षापासून नौदलात सामावून घेतले जाणार आहे. आतापर्यंत एकूण 3000 अग्निवीर नौदलात सामील झाले आहेत. अशा प्रकारे अग्निवीरांची पहिली तुकडी तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा: Indian Navy Recruitment 2022 : नौदलात मुलाखतीविना १०वी उत्तीर्णांची भरती

नौदल दिनाच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेत नौदल प्रमुखांनी या गोष्टी सांगितल्या. आता नौदलाच्या फक्त 8-8 शाखा नाही तर सर्व शाखा सर्वांसाठी खुल्या राहणार असल्याच त्यांनी सांगितल आणि 2023 पर्यंत सर्व शाखांमध्ये महिला अधिकार्‍यांचा समावेश करण्याचा विचार करत आहोत.

हेही वाचा: Indian Navy Day : भारतीय नौदलाच्या काही खास गोष्टी

25 वर्षात नौदल स्वयंपूर्ण होईल

नौदल प्रमुखांनी सरकारला आश्वासन दिले आहे की ते 2047 पर्यंत 'आत्मनिर्भर' होईल. ते म्हणाले की, हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या कारवायांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. गेल्या वर्षभरात भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावामुळे सागरी सुरक्षेला महत्त्व आले आहे.

हेही वाचा: Indian Navy Day : भारतीय नौदलाच्या काही खास गोष्टी

भारत अमेरिकेकडून करणार प्रिडेटर ड्रोन खरेदी

चीनवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेकडून प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या तयारीत असल्याच त्यांनी सांगितल आहे. भारत 3 अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून 30 MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी करणार आहे. हेलफायर क्षेपणास्त्र या ड्रोनद्वारेच प्रक्षेपित करण्यात आलेल आणि याच ड्रोनच्या मदतीने अल-कायदाचा दहशतवादी अल-जवाहिरीही मारला गेला.