phc
phce sakal

राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची 7 हजार पदं रिक्त

दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय महत्वाची ठरतात. मात्र बऱ्याचचदा याठिकाणी उपचार मिळत नाही.

पालघर जिल्ह्यातील गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. रेखा पोतिंदा ( वय ३६) असं या महिलेचं नाव आहे. पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यात असलेल्या कायरी गावीत राहत होत्या. त्या पाचव्यांदा गर्भवती होत्या. त्यांना ऑक्टोबर २०२१मध्ये अचानक पोट दुखायला सुरुवात होऊन रक्त जात असल्याने त्यांना गावापासून १०- १२ किलोमीटर दूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं. पण साखरशेत येथील प्राथमिक आरोग्य केंदाने त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितलं.जवाहर शासकिय रुग्णालयाने गर्भवती रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याने नाशिक येथे हलवण्यास सांगितलं. मात्र बरेच तास रक्त जात असल्याने महिलेचा आणि तिच्या बाळाचाही मृत्यू झाला. (35% post of healthcare workers are vacant in Maharashtra)

महाराष्ट्रात १८३९ उपजिल्हा रुग्णालय आहेत, त्यापैकी अनेक ठिकाणी पुरेशा प्रमाणात कर्मचारी नसल्याचं समोर आलंय. ३५ टक्के मान्यताप्राप्त जागा या भरल्याच गेल्या नसल्याचं समोर येतंय. माहिती आधिकाराअतर्गत ही माहिती मागविण्यात आली आहे. अतिशय दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय महत्वाची ठरतात. मात्र बऱ्याचचदा या ठिकाणी उपचार मिळत नाही. अनेकदा डॉक्टर उपलब्ध नसतात. अशा अनेक समस्यांमुळे गर्भवती महिला, बालक आणि वृद्ध यांना जीवाला मुकावं लागतं.

phc
नवरात्रीत मांसविक्रीवर बंदी; महुआ मोईत्रा म्हणाल्या, मटण खाण्याचं स्वातंत्र्य

आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण २१ हजार ४९६ मान्यताप्राप्त पद आहेत. मात्र त्यापैकी तब्बल ७ हजार पदं भरली गेलेली नाही. डॉक्टरांच्या एकूण ४ हजार ३६ पदं आहेत. त्यापैकी ३३७ पद भरलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. २००५ सालच्या तुलनेत ही परिस्थिती अतिशय भयावह आहे. कारण २००५ साली सर्व जागांवर पदभरती झाली होती. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठा ताण आहे. अनेकदा उपचार न मिळणं, आरोग्यकेंद्रात स्वच्छतेचा अभाव, डॉक्टर उपलब्ध नसणं या समस्या जाणवतात. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. या सगळ्यांमुळे खासगी रुग्णालयांत जाण्याशिवाय आनेकांना पर्याय उरत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com