खावटी कर्ज योजनेचे साडेतीन हजार अर्ज रद्द, राज्यात ९ लाख ६२ हजार लाभार्थी

khawati
khawatie sakal

अमरावती : कोविडच्या (coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात आदिवासींना एक आधार मिळावा, यादृष्टीने सुरू केलेल्या खावटी कर्ज योजनेसाठी आलेल्या अर्जांपैकी राज्यातून जवळपास 3 हजार 466 जणांच्या अर्जात त्रुटी काढून ते रद्द करण्यात आले. (3500 application of khawati scheme has been cancel)

khawati
श्रीनिवास रेड्डीची उच्च न्यायालयात धाव; राज्य शासनाला नोटीस

कोरोनाच्या लाटेचा परिणाम जसा शहरी भागात झाला त्याचप्रमाणे आदिवासी दुर्गम भागातसुद्धा जनमानसावर त्याचे परिणाम जाणवू लागले. त्यासाठी राज्य शासनाने आदिवासी क्षेत्रासह क्षेत्राबाहेर राहणाऱ्या आदिवासींसाठी खावटी कर्ज योजना सुरू केली. त्यानुसार निवड झालेल्या कुटुंबाला चार हजारांपर्यंत एकूण मदत अपेक्षित आहे. त्यात दोन हजारांची रोख रक्कम डीबीटी अंतर्गत आधार लिंक बॅंकखात्यात जमा होणार असून, उर्वरित दोन हजार रुपयांची मदत ही धान्य (वस्तू) स्वरूपात देण्याचे जाहीर झाले. योजना चांगली असली तरी कोविड काळात लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी बराच विलंब झाला. महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाच्या चार अपर आयुक्तालयांतर्गत एकूण 9 लाख 52 हजार 669 लाभार्थ्यांची या योजनेच्या लाभासाठी निवड झाली. त्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला रोख मदतीच्या स्वरूपातील टप्पा जमा झाला.

khawati
श्रीनिवास रेड्डीची उच्च न्यायालयात धाव; राज्य शासनाला नोटीस

अनेकांच्या खात्यात पहिलीच रोख मदतीची रक्कम अद्याप जमा झाली नाही. त्यामुळे निवड झालेल्या लाभार्थ्यांकडून सतत अपर आयुक्तालयासह प्रकल्प अधिकाऱ्यांकडे लाभार्थ्यांकडून सातत्याने विचारणा सुरू झाली. रोख स्वरूपातील मदत जमा झाल्यानंतर वस्तू स्वरूपातील मदत लाभार्थ्यांच्या थेट घरापर्यंत पोहोचविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. राज्यात आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तालयाचा विचार केल्यास खावटी कर्ज योजनेचे सर्वाधिक 4 लाख 22 हजार 888 लाभार्थी हे नाशिक विभागात तर सर्वांत कमी 1 लाख 51 हजार 846 लाभार्थी सद्य:स्थितीत अमरावती अपर आयुक्तालयांतर्गत निवडल्या गेले. लाभार्थ्यांच्या संख्येत तांत्रिक त्रुट्या दूर केल्यास वाढ होऊ शकते. विशेषतः दुर्गम भागात घरापर्यंत वस्तूंचा पुरवठा करणे अवघड बाब आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांपैकी काहींच्या खात्यात आर्थिक मदत जमा झाली. वस्तू अद्याप कुणालाही मिळालेल्या नाहीत. कोविड काळात प्रत्यक्षात वस्तू वाटप सुरू झाल्यानंतर त्याचे परिणाम दिसू लागतील. एकंदर बऱ्यापैकी कसरत होण्याची शक्‍यता आहे.

अपर आयुक्तालय : लाभार्थी संख्या

  1. अमरावती - 1 लाख 51 हजार 846

  2. नागपूर -1 लाख 60 हजार 629

  3. नाशिक - 4 लाख 22 हजार 888

  4. ठाणे - 1 लाख 17 हजार 306

khawati
रविवारपासून कडक लॉकडाउन, वैद्यकीय सेवा वगळून किराणा भाजीपाल्यासह सर्वच बंद
राज्यातील खावटी कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 9 ला 52 हजार 669 आहे. दुर्गम भागातील जनतेचे हित लक्षात घेऊनच राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. जसे आदेश होतील त्यानुसार लाभार्थ्यांपर्यंत वस्तू स्वरूपातील मदत पोहोचविल्या जाईल.
-विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com