

सोलापूर : इयत्ता बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ३२ हजार १७५ मुलांपैकी २९ हजार २३७ तर २४ हजार ४२४ मुलींपैकी २३ हजार ३८८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व शाखांमधील मुलांचा निकाल ९०.८६ टक्के तर मुलींचा निकाल ९५.७५ टक्के लागला असून जिल्ह्याच्या एकूण निकालाची टक्केवारी ९२.९७ टक्के आहे.
पुणे विभागात पुण्याचा निकाल ९३.२० टक्के लागला असून सोलापूरने यंदा नगरला (९२.३३ टक्के) मागे टाकत विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा बैठे पथकांसह भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली होती. त्यामुळे यंदा निकालाच्या एकूण टक्केवारीत घट झाल्याचे चित्र असून कला शाखेचा निकाल सर्वात कमी झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ व सांगोला या तीन तालुक्यांचाच निकाल ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत दोन हजार ९३८ मुले तर एक हजार ३६ मुली अनुत्तीर्ण झाल्या आहेत.
निकालासंदर्भातील ठळक बाबी...
जिल्ह्यातील ३२ हजार १७५ मुलांनी तर २४ हजार ४२४ मुलांनी दिली होती इयत्ता बारावीची परीक्षा
परीक्षा दिलेल्यांपैकी २९ हजार २३७ मुले (९०.८६ टक्के) आणि २३ हजार ३८८ मुली (९५.७५ टक्के) उत्तीर्ण झाल्या
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील दोन हजार ९३८ मुले आणि एक हजार ३६ मुली अनुत्तीर्ण झाल्या आहेत
कला शाखेचा निकाल (८७.८५ टक्के) सर्वात कमी; विज्ञान शाखेचा निकाल ९७.३१ टक्के
बारावीच्या निकालात करमाळा तालुका (८५.७७ टक्के) सर्वात मागे, तर जिल्ह्यात निकालात मंगळवेढा (९६.९७ टक्के) अव्वल
शाखानिहाय निकालाची टक्केवारी
शाखा परीक्षा दिलेले उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
कला १५,६६६ १३,७६४ ८७.८५
वाणिज्य ६,१६९ ५,७५६ ९३.३०
विज्ञान ३०,३३० २९,५१७ ९७.३१
एमसीव्हीसी १,३७३ १,२२९ ८१.५१
विज्ञान व तंत्रज्ञान १५८ १४८ ९३.६७
सोलापूर जिल्ह्याचा निकाल
नोंदणी केलेले विद्यार्थी
५७,०४६
परीक्षेला बसलेले विद्यार्थी
५६,५९९
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
५२,६२५
निकालाची टक्केवारी
९२.९७ टक्के
तालुकानिहाय निकाल
तालुका एकूण परीक्षार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
अक्कलकोट २९२६ २६७६ ९२.२१
बार्शी ५९८७ ५३९५ ९०.११
करमाळा २२७८ १९५४ ८५.७७
माढा ३९१३ ३७०१ ९४.५८
माळशिरस ६१६७ ५८९७ ९५.६२
मंगळवेढा ३०१२ २९२१ ९६.९७
मोहोळ २८५१ २७५७ ९६.७०
पंढरपूर ७५८३ ७१४० ९४.१५
सोलापूर १७१५८ १५६६५ ९१.२९
सांगोला ४७४८ ४५१९ ९५.१७
एकूण ५६५९९ ५२६२५ ९२.९७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.