esakal | खुषखबर..! कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्यात आजपासून "इतके' इम्युनिटी क्‍लिनिक दिमतीला 
sakal

बोलून बातमी शोधा

Immunity Clinic

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयुष टास्क फोर्स व निमा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना, सर्वसामान्याला कोरोना विषाणूपासून स्वतःला वाचवता येईल यासाठी संतुलित जीवनशैलीद्वारे प्रतिकारक्षमता टिकवून धरणे हा सद्य:परिस्थितीत कोरोना संकटातील उपाय आहे ही भूमिका समोर आली. त्यासाठी इम्युनिटी क्‍लिनिक हा राज्यभरातील सर्वसामान्य निरोगी व्यक्ती, लक्षण नसलेले रुग्ण व इतर रुग्णांसाठी सुरू करण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. आयुर्वेदाच्या संतुलित जीवनशैलीच्या माध्यमातून निर्माण होणारी प्रतिकारक्षमता या निकषावर हे क्‍लिनिक सुरू केले जाणार आहेत. 

खुषखबर..! कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्यात आजपासून "इतके' इम्युनिटी क्‍लिनिक दिमतीला 

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : कोरोना आजारावर लस अथवा रामबाण औषध सध्याच्या स्थितीत तरी उपलब्ध नसले, तरी सर्वसामान्य निरोगी माणसाला त्याची स्वतःची प्रतिकारक्षमता टिकवणे व वाढवणे हा एकमेव आधार आहे. ही प्रतिकारक्षमता टिकून राहावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत चारशे निमा आयुर्वेद इम्युनिटी क्‍लिनिक आजपासून सुरू होत आहेत. राज्य शासनाच्या आयुष टास्क फोर्स व "निमा' या वैद्यकीय संघटनांनी निर्मिती केलेले हे क्‍लिनिक सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा : "अटल रॅंकिंग'मध्ये "सिंहगड'ची बाजी; उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मिळविले स्थान 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयुष टास्क फोर्स व निमा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना, सर्वसामान्याला कोरोना विषाणूपासून स्वतःला वाचवता येईल यासाठी संतुलित जीवनशैलीद्वारे प्रतिकारक्षमता टिकवून धरणे हा सद्य:परिस्थितीत कोरोना संकटातील उपाय आहे ही भूमिका समोर आली. त्यासाठी इम्युनिटी क्‍लिनिक हा राज्यभरातील सर्वसामान्य निरोगी व्यक्ती, लक्षण नसलेले रुग्ण व इतर रुग्णांसाठी सुरू करण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. आयुर्वेदाच्या संतुलित जीवनशैलीच्या माध्यमातून निर्माण होणारी प्रतिकारक्षमता या निकषावर हे क्‍लिनिक सुरू केले जाणार आहेत. 

हेही वाचा : शेट्टींच्या दूध आंदोलनाचे कनेक्‍शन "मातोश्री'वर, रिमोट मात्र बारामतीत ! कोणी केली टीका? वाचा 

या क्‍लिनिकच्या माध्यमातून राज्यातील सर्वच जिल्ह्यांत सर्वसामान्य व्यक्तीला स्वतःच्या प्रतिकारक्षमतेच्या संदर्भात काही उपाययोजना क्‍लिनिकच्या मदतीने मिळणार आहेत. त्यासाठी इम्युनिटी क्‍लिनिक प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. या क्‍लिनिकच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीला स्वतःची तपासणी करून घेता येणार आहे. आयुर्वेदाच्या निकषावर व्यक्तीला त्याची प्रकृती, आहार-विहार याचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच या क्‍लिनिकमधून दहा प्रकारच्या औषधांचे वितरणही केले जाईल. याशिवाय व्यक्तीच्या शारीरिक स्थितीनुसार त्याला तज्ज्ञ डॉक्‍टर इतर औषधी देखील सुचवणार आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारक्षमतेची पातळी निश्‍चित करून ही क्षमता वाढीस लागण्याच्या दृष्टीने दर पंधरा दिवसाला इम्युनिटी क्‍लिनिकमध्ये तपासणी करता येणार आहे. औषधीसोबत आवश्‍यक ते व्यायाम, आहार आदी अनेक सूचना क्‍लिनिकमधून मिळणार आहेत. नागरिकांना स्वतःची प्रतिकारक्षमता सुनिश्‍चित करणारा हा प्रयोग आयुर्वेद क्षेत्रातील संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 

राज्यात एकूण 400 इम्युनिटी क्‍लिनिकचे उद्‌घाटन आज (गुरुवारी) सायंकाळी पाच वाजता ऑनलाइन पद्धतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या आयुष टास्क फोर्स कोविड-19 चे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने, सदस्या तथा मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, इम्युनिटी क्‍लिनिक प्रकल्पचे समन्वयक डॉ. संजय लोंढे, निमाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, केंद्रीय कोषाध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top