sakal

बोलून बातमी शोधा

Rajkaran

राजू शेट्टी यांना जनतेने नाकारले असून, सोलापुरात मोर्चा दुधाचा पण गर्दी बैलगाडी, ट्रॅक्‍टरची अशी अवस्था झाली होती. जनतेत असलेली पत संपल्याने आंदोलनासाठी ट्रॅक्‍टर व बैलगाडीचा आधार घ्यावा लागला. आमदारकीसाठी स्वाभिमान गहाण टाकलेल्या शेट्टींना दुधाच्या प्रश्‍नावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली. 

शेट्टींच्या दूध आंदोलनाचे कनेक्‍शन "मातोश्री'वर, रिमोट मात्र बारामतीत ! कोणी केली टीका? वाचा 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर : आमदारकी पदरात पाडण्यासाठी राजू शेट्टी यांनी दूध आंदोलनाचा घाट घातला आहे. मुंबईकडे जाणारे दूध रोखून धरण्यापेक्षा "मातोश्री'वर जाणारे दूध बंद करा. मुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री हेच शेट्टी यांचे बोलवते धनी असून, त्यांच्या दूध आंदोलनाचे कनेक्‍शन "मातोश्री'वर तर रिमोट बारामतीत असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली. 

हेही वाचा : सोलापुरातून पुण्यासाठी दर दोन तासाला एसटी ! इतर जिल्ह्यांसाठी "हे' आहे वेळापत्रक 

राजू शेट्टी यांना जनतेने नाकारले असून, सोलापुरात मोर्चा दुधाचा पण गर्दी बैलगाडी, ट्रॅक्‍टरची अशी अवस्था झाली होती. जनतेत असलेली पत संपल्याने आंदोलनासाठी ट्रॅक्‍टर व बैलगाडीचा आधार घ्यावा लागला. आमदारकीसाठी स्वाभिमान गहाण टाकलेल्या शेट्टींना दुधाच्या प्रश्‍नावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका देशमुख यांनी केली. 

हेही वाचा : वंचित बहुजन आघाडीचा जल्लोष ! जिल्हाबाहेर जाणाऱ्या पहिल्या "एसटी'ची आतषबाजीने रवानगी 

दूध आंदोलनाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असून, तो केंद्र सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न आघाडी सरकारच्या माध्यमातून शेट्टी यांच्यामार्फत केला जात आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह शेट्टी यांचे खासगी दूध संघ व सहकारी दूध संघ असून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठीच ठरवून दुधाचे दर कमी केले आहेत. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत असल्याचा धसका घेत खुद्द शरद पवारांनीच शेट्टींच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना सोलापुरात आंदोलन करण्यास भाग पाडले आहे, असेही श्री. देशमुख म्हणाले. 

भाजपच्या काळात दुभाचा भाव 25 रुपये 
देवेंद्र फडणवीस सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान तर 25 रुपये प्रतिलिटर दुधाला भाव दिला होता. आता 16 रुपये प्रतिलिटर दुधाचा दर असल्याने भाजपने प्रतिलिटर 10 रुपये अनुदानाची मागणी केली आहे. मात्र, शेट्टी यांनी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मागितले आहे. ते सरकारचीच भाषा बोलत आहेत. भाजप सरकारने दिलेले अनुदान बंद करून आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सरकारने सत्तेत आल्यापासून फरक बिल देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. शेट्टी यांचे आंदोलन हे "मॅच फिक्‍सिंग'सारखे असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

go to top