बारावीच्या पहिल्याच इंग्रजी पेपरला ४२ कॉपी केस! 'या' ६ विभागातील ४२ केंद्रांची मान्यता होणार रद्द; अमरावती, पुणे विभागात सर्वाधिक गैरप्रकार, वाचा...

मुंबई, कोल्हापूर, कोकण विभागात एकही कॉपी केस आढळली नाही. अमरावती विभागात २२, पुणे विभागात १०, नाशिक विभागात चार, छत्रपती संभाजीनगर विभागात तीन, लातूर विभागात दोन आणि नागपूर विभागात एक कॉपी केस आढळली. या केंद्रांची मान्यता आता रद्द होणार आहे.
hsc exam

hsc exam

sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून (ता. १०) परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा झाला. सोलापूर शहर-जिल्ह्यातील १२० केंद्रांवर ५६ हजार आठ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचा पेपर दिला. विद्यार्थ्यांना सर्वात कठीण वाटणाऱ्या इंग्रजीचा पेपर कॉपीमुक्त पार पडला. पण, मुंबई, कोल्हापूर, कोकण विभागात एकही कॉपी केस आढळली नाही. अमरावती विभागात २२, पुणे विभागात १०, नाशिक विभागात चार, छत्रपती संभाजीनगर विभागात तीन, लातूर विभागात दोन आणि नागपूर विभागात एक कॉपी केस आढळली. या केंद्रांची मान्यता आता रद्द होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ५६ हजार २९७ विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज केले होते. पण, त्यातील २०९ विद्यार्थी परीक्षेला आले नव्हते. बहुतेक विद्यार्थी पहिल्या पेपर असल्याने केंद्राची माहिती व्हावी, परीक्षा क्रमांक कोठे आला हे समजावे म्हणून दहा वाजताच केंद्रांवर पोचले होते. प्रत्येक विद्यार्थ्याची झडती घेऊन केंद्रात प्रवेश देण्यात आला. अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. काही विद्यार्थी साडेदहा वाजता केंद्रांवर पोचले, त्यांची गडबड पाहायला मिळाली.

या परीक्षेसाठी शिक्षण विभागाची आठ आणि महसूल विभागाची ११ भरारी पथके होती. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सोलापुरातील ज. रा. चंडक प्रशालेतील केंद्राला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मोहोळमधील नेताजी प्रशाला व नागनाथ विद्यालयातील केंद्रास भेट देऊन परीक्षेची पाहणी केली. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. पर्यवेक्षकांनीही कॉपी केस आढळणार नाही, याची खबरदारी घेतली होती.

ठळक बाबी...

  • शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिल्या तीन परीक्षा केंद्रांना भेटी

  • महसूल विभागाच्या ११ पथकांची जिल्हाभरातील केंद्रांना भेटी

  • इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरला १२० केंद्रांवर कोठेही सापडली नाही कॉपी केस

  • २०९ विद्यार्थ्यांची परीक्षेला दांडी, ५६ हजार ८ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

आज हिंदी विषयाचा पेपर

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा उद्या (बुधवारी) पेपर नाही. कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर आहे. सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या पेपरची वेळ असणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी साडेदहा वाजताच परीक्षा केंद्रावर पोचावे लागणार आहे.

विभागनिहाय कॉपी केस

  • विभाग कॉपी केसेस

  • अमरावती २२

  • पुणे १०

  • नाशिक ०४

  • छ.संभाजीनगर ०३

  • लातूर ०२

  • नागपूर ०१

  • एकूण ४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com