राज्यातील ४४३३ शिक्षक होणार अतिरिक्त? जिल्हा परिषदेच्या ५२ हजार शाळांची संचमान्यता पूर्ण

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील जवळपास ७३ हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्डच मिळालेले नाही. आता संचमान्यता अंतिम टप्प्यावर असल्याने राज्यातील चार हजार ४३३ शिक्षक अतिरिक्त होतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
schools
schoolssakal
Updated on

सोलापूर : राज्यातील ५२ हजार जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता झाली असून आता उर्वरित १५ हजार शाळांची संचमान्यता पुढच्या आठ दिवसांत संपविली जाणार आहे. दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील जवळपास ७३ हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्डच मिळालेले नाही. आता संचमान्यता अंतिम टप्प्यावर असल्याने राज्यातील चार हजार ४३३ शिक्षक अतिरिक्त होतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित संस्थांमध्ये अंदाजे ६७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ‘आरटीई’च्या निकषांनुसार प्रत्येकी ३० मुलांमागे एक शिक्षक बंधनकारक आहे. पण, मागील साडेपाच वर्षांत शिक्षक भरती न झाल्याने हा निकष डावलला गेला आहे. या पार्श्वभूमीवर एकूण रिक्तपदांच्या ८० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे.

पण, सध्या पहिल्या टप्प्यात ५० टक्के पदे भरली जाणार आहेत. त्याचा कृती आराखडा शालेय शिक्षण विभागाने तयार केला आहे. आता छत्रपती संभाजीनगर व नागपूर उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिका निकाली निघताच भरतीला सुरवात होईल, असेही शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठा सेवा संघाच्या मागणीनंतर ‘रोस्टर’ची तयारी

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बिंदुनामावलीतील ’एसईबीसी’ हा संवर्ग काढून टाकण्यात आला आहे. त्यानंतर बिंदुनामावलीत म्हणजेच रोस्टरमध्ये मराठा समाजाची (खुल्या संवर्गाची) रिक्तपदे दिसत नाहीत. त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी मराठा सेवा संघाने शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली. त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद ‘सीईओं’ची बैठक घेतली. त्यानुसार रोस्टर अंतिम करण्याची मुदत आज (शुक्रवारी) संपणार आहे.

खासगी शाळांमधील मुलाखतीसाठी आता १:३ उमेदवार

जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारे होणार आहे. ‘टेट’च्या मेरिटवरून उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पर्याय दिला जाणार आहे. दुसरीकडे खासगी संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी सुरवातीला एका पदासाठी दहा उमेदवारांच्या मुलाखतींचे बंधनक होते. पण, आता त्यासाठी १:३ असे प्रमाण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ‘टेट’ उत्तीर्ण होऊनही अनेकांना शिक्षक भरतीच्या शर्यतीतून बाहेर जावे लागणार आहे.

झेडपी शाळांची स्थिती

  • एकूण शाळा

  • ६७,०००

  • रिक्त शिक्षक

  • ३२०००

  • आधार नसलेले अंदाजे विद्यार्थी

  • ७३,०००

  • अंदाजे अतिरिक्त शिक्षक

  • २,४३३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.