तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये मिळत नसतील तर ५ तारखेपर्यंत होणाऱ्या मोहीमेत सहभागी व्हा

अशोक मुरुमकर
Friday, 24 July 2020

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

अहमदनगर : जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप या योजनेचा ज्यांनी लाभ घेतला नाही, त्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबविणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना राबवली. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. बँकेच्या खात्यात तीन हप्त्यात ही रक्कम जमा होते. याचा लाभ ज्यांनी घेतला नाही. त्यांच्यासाठी राज्य सरकार 5 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविणार आहे.

यामध्ये ज्या लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असं आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. यासंदर्भाती त्यांनी ट्विट केले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 91 लाख 13 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात पाच हप्त्यात 6 हजार 949 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 August Deadline for participation in PM Kisan Samman Yojana till