मराठी-उर्दू भाषेतील देवाणघेवाणीसाठी राज्यात 5 उर्दू घरं!

मराठी-उर्दू भाषेतील देवाणघेवाणीसाठी राज्यात 5 उर्दू घरं! राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती 5 Urdu houses in the state for Marathi-Urdu literature exchange
nawab malik
nawab malik file photo
Updated on

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: राज्यात उर्दू भाषेची प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सृजनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाङ्मयीन विकास व्हावा यासाठी राज्यात 5 ठिकाणी 'उर्दू घरे' स्थापन केली जाणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. उर्दू घरासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. या उर्दू घरांची कामे लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून त्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातही धोरण निश्चित करण्यात आले असल्याचे मलिक यांनी सांगितले. (5 Urdu houses in the state for Marathi-Urdu literature exchange)

nawab malik
बनावट लसीकरण झालेल्यांबद्दल राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

नांदेड येथील उर्दू घरासाठी 8.16 कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे. आता या घराचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येईल. सोलापूर येथे उर्दू घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून त्याकरिता आतापर्यंत 6.82 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. मालेगाव उर्दू घराचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु आहे. मुंबई येथे मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात उर्दू घर बांधणे प्रस्तावित असून याबाबतचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाकडून शासनास सादर केला जाणार आहे. नागपूर येथील इस्लामिक कल्चरल सेंटरची इमारत उर्दू घर म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी 50 लाख रुपये इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे, अशीही माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

nawab malik
धक्कादायक! दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या

उर्दू घरांमध्ये वर्षातील अधिकाधिक दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन इत्यादी स्वरुपाचे कार्यक्रम होतील. उर्दू घरातील वाचनालय, ग्रंथालयामध्ये उर्दू, मराठी आणि हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे, उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके उपलब्ध असतील. नवी दिल्ली येथील नॅशनल काऊन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम यांच्या धर्तीवर उर्दू घरांमध्ये प्रशिक्षण, अभ्यासक्रम चालविले जातील. यासाठी काऊन्सिलकडून अनुदान, मार्गदर्शन मिळविले जाईल. काऊन्सिलमार्फत चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाच्या धर्तीवर उर्दू भाषिक नसलेल्या समुदायाला उर्दू शिकविण्यासाठी उर्दू घरामध्ये वर्ग चालविणे जाणार आहेत, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com