सांगोल्यात 'भूगोल'च्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला, तरीपण पेपर उद्याच होणार! शाळेत ६४ सीसीटीव्ही कॅमेरे पण सगळेच होते बंद; दोघे निलंबीत, पोलिसावरही कारवाई

भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्या, पण त्या कोठेही सोशल मिडीयावर किंवा इतरत्र व्हायरल झालेल्या नाहीत. ४० गुणांचा हा पेपर चोरीला जाण्यामागे काहीतरी वेगळेच कारण असल्याचा संशय आहे. त्यामुळे उद्या (बुधवारी) होणारा पेपर ठरलेल्या वेळेतच होईल, असा निर्णय बोर्डाने जाहीर केला आहे.
Maharashtra Board SSC exam

Maharashtra Board SSC exam

sakal 

Updated on

सांगोला : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा उद्या (बुधवारी) शेवटचा भूगोल विषयाचा पेपर आहे. तत्पूर्वी, मंगळवारी पहाटेच्या सुमारास सांगोला येथील विद्या मंदिर प्रशालेच्या बोर्ड कस्टडीतून या विषयाच्या ५० प्रश्नपत्रिकांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत सांगोल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले (वय ३४) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे.

१६ मार्चला दुपारी साडेचार ते १७ मार्च रोजी सकाळी साडेआठ यावेळेत ही घटना घडली आहे. सांगोला विद्यामंदिर येथील बोर्ड कस्टडी रूममध्ये ठेवलेल्या पेटी क्रमांक ५४४९ मधील भूगोल विषयाच्या २५-२५ प्रश्नपत्रिकांची पाकिटे अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी १७ मार्च रोजी सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन मोरे करीत आहेत.

‘सीसीटीव्ही’ बंद असल्याचा चोरट्याने घेतला फायदा

सांगोला तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर येथील बोर्ड कस्टडी रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, कस्टडी रूमबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. चोरट्यांनी याचाच फायदा घेऊन प्रश्नप्रत्रिका चोरुन नेल्याचा संशय आहे. त्या शाळेत ६४ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण त्या रात्री एकही सुरु नव्हता. पेपर सुरु असतानाच काही ‘सीसीटीव्ही’ सुरु ठेवायचे. पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही तपासून संशयिताचा शोध सुरु केला आहे.

२५ जणांची चार पथके रवाना

प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची माहिती मिळताच प्रभारी पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रात्री अभ्यासिकेसाठी आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांची चौकशी केली. श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. ठसे तज्ज्ञांनाही बोलावण्यात आला होते. संशयिताच्या शोधासाठी २५ अधिकारी व अंमलदारांची चार पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकीरडे, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हेही घटनास्थळी थांबून होते.

गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक निलंबीत

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन बोर्डाने सांगोल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले व प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना निलंबीत केले आहे. दुसरीकडे तेथील बंदोबस्तावरील पोलिसाच्या हलगर्जीपणा बद्दल त्या अंमलदारावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रभारी पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी सांगितले.

पेपर ठरलेल्या दिवशी वेळेत होईल

भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्या, पण त्या कोठेही सोशल मिडीयावर किंवा इतरत्र व्हायरल झालेल्या नाहीत. ४० गुणांचा हा पेपर चोरीला जाण्यामागे काहीतरी वेगळेच कारण असल्याचा संशय आहे. त्यामुळे उद्या (बुधवारी) होणारा पेपर ठरलेल्या वेळेतच होईल, असा निर्णय बोर्डाने जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com