Sugar Production : राज्यात ५३० लाख क्विंटल साखर उत्पादन; आतापर्यंत ५६८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात आजअखेरपर्यंत (ता.२०) एकूण ५३०.३० लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.
Sugar Production
Sugar Productionsakal

पुणे - राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात आजअखेरपर्यंत (ता.२०) एकूण ५३०.३० लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. राज्यात आतापर्यंत १९८ साखर कारखान्यांनी मिळून एकूण ५६७.९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. राज्यातील साखर उत्पादनाचा सरासरी उतारा ९.३४ टक्के इतका झाला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाच्या तुलनेत यंदाच्या गळीत सुरु झालेले साखर कारखान्यांची संख्या, आतापर्यंत गाळप झालेला ऊस, उत्पादित झालेली साखर आणि साखर उतारा या सर्वच बाबींमध्ये मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत आज अखेरपर्यंत गळीत पूर्ण झालेल्या उसाच्या तुलनेत यंदा ८६.६६ लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे.

गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एकूण६५४.५८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते. साखर उत्पादनही ९७ लाख १२ हजार क्विंटलने कमी झाले आहे. गेल्या वर्षी आजअखेरपर्यंत ६२७.४२ लाख क्विंटल इतके साखर उत्पादन झाले होते. साखर उताऱ्यातही ०.२५ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी आजअखेरपर्यंतचा सरासरी साखर उतारा हा ९.५९ टक्के होता.

यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत एकूण १९८ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरु केले आहे. यामध्ये ९७ सहकारी आणि १०१ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. राज्याच्या साखर आयुक्तालयाच्या वतीने आज यंदाच्या ऊस गळीत हंगामाची सद्यःस्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

साखर उत्पादनात राज्यात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली असून, या विभागातील आतापर्यंतचे साखर उत्पादन हे सर्वाधिक १३५.२४ लाख क्विंटल इतके झाले आहे. साखर उत्पादनात पुणे विभाग हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून, या विभागात आतापर्यंत ११५.८८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

आतापर्यंत ऊस गाळप सुरु केलेल्या एकूण कारखान्यांमध्ये कोल्हापूर विभागातील ३७, पुणे विभागातील ३०, सोलापूर विभागातील ४७, नगर विभागातील २६, छत्रपती संभाजीनगर विभागातील २२, नांदेड विभागातील २९, अमरावती विभागातील तीन आणि नागपूर विभागातील चार साखर कारखान्याचा समावेश आहे.

विभागनिहाय पूर्ण झालेले उसाचे गाळप (लाख मेट्रिक टनमध्ये)

- कोल्हापूर --- १२६.२१ लाख मेट्रिक टन

- पुणे --- १२१.०६

- सोलापूर --- १२३.२४

- नगर --- ७२.३९

- छत्रपती संभाजीनगर ---५४.२०

- नांदेड --- ६४.१५

- अमरावती --- ४.९७

- नागपूर --- १.७०

विभागनिहाय आजअखेरचे साखर उत्पादन (लाख क्विंटलमध्ये)

- कोल्हापूर --- १३५.२४ लाख

- पुणे --- ११५.८८ लाख

- सोलापूर --- १०५.८६ लाख

- नगर --- ६५.५८ लाख

- छत्रपती संभाजीनगर --- ४३.३७ लाख

- नांदेड --- ५९.३५ लाख

- अमरावती --- ४.३९ लाख

- नागपूर --- ०.६३ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com