esakal | राज्यामध्ये वर्षभरात रोखले ५६० बालविवाह
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

राज्यामध्ये वर्षभरात रोखले ५६० बालविवाह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यात (Pune District) बालविवाह (Child Marriage) होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना (Measures) कराव्यात. तसेच, बालविवाह होत असल्याचे लक्षात आल्यावर संबंधितांविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई (Crime) करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांनी दिल्या. (560 child marriages stopped in the state during the year)

कोरोनाच्या कालावधीत इतर समस्यांसोबत बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ५६० बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारनेही सूचना दिल्या आहेत. बालविवाह बेकायदेशीर असून, त्याविरोधात गुन्हा नोंदविणे अपेक्षित आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक आणि शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा: पुण्यातील हाय अलर्ट गावांमध्ये घराबाहेर पडण्यास मज्जाव; घरातही हवा मास्क

जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात बालकल्याण समिती, पोलिस उपमहानिरिक्षक, पोलिस अधीक्षक, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या निदर्शनास आणून बालविवाह रोखण्याची कारवाई करावी, असे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

loading image