esakal | पुण्यातील हाय अलर्ट गावांमध्ये घराबाहेर पडण्यास मज्जाव; घरातही हवा मास्क
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील हाय अलर्ट गावांमध्ये घराबाहेर पडण्यास मज्जाव; घरातही हवा मास्क

पुण्यातील हाय अलर्ट गावांमध्ये घराबाहेर पडण्यास मज्जाव; घरातही हवा मास्क

sakal_logo
By
अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेली गावे हाय अलर्ट म्हणून घोषित करण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या गावांमधील नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू नये. तसेच, कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घरी असतानाही मास्कचा वापर करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व्हे करण्यात आला. ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे, अशी गावे हाय अलर्ट घोषित करण्यात आली आहेत. तसेच, ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी होत नाही, ती अलर्ट गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

हाय अलर्ट आणि अलर्ट गावांमध्ये जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेल्हे तालुक्यातील सुमारे शंभराहून अधिक गावांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इतर गावे अलर्ट घोषित करून आवश्यक उपाययोजना करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना राहतील. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सर्व गावस्तरीय समित्या कार्यान्वित कराव्यात. ग्रामीण पोलिसांनी या ग्रामपंचायत क्षेत्रात पाळत वाढवावी. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी. सर्व गावांमध्ये लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. तसेच, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

हेही वाचा: पुणे मार्केटयार्डात लसीकरण केंद्र सुरु

नागरिकांसाठी सूचना :

  • - अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त गावातील नागरीकांनी बाहेर पडू नये

  • - आरोग्यविषयक कामकाज असेल तरच शक्यतो बाहेर पडावे

  • - घरात कुटुंबासमवेत असतानाही मास्कचा वापर करावा- सहव्याधी असलेले नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

  • - अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडल्यानंतर सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.

हवेली तालुक्यातील हाय अलर्ट गावे :

वाघोली, नऱ्हे, नांदेड, कदमवाकवस्ती, मांजरी बु. गाऊडदरा, किरकटवाडी, लोणीकाळभोर, मांजरी खु., केसनंद,

वडगाव शिंदे, आव्हाळवाडी, पेरणे, थेऊर, आळंदी म्हातोबा, लोणीकंद, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, फुलगाव, देहू नगरपंचायत.

हवेली तालुक्यातील अलर्ट गावे :

उरुळी कांचन, कोंढवे धावडे, डोणजे, खडकवासला, शिंदवणे, मांगडेवाडी, रहाटवडे.

loading image