मुंबई - राज्यात आतापर्यंत ५८ लाख ७७ हजार ९९३ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदींच्या आधारे आठ लाख २५ हजार ८५१ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती माजी न्या. संदीप शिंदे समितीच्या चौथ्या अहवालात दिली आहे..मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास निर्माण होत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीने चौथा अहवाल नुकताच राज्य सरकारकडे दिला आहे.या अहवालानुसार राज्यात आतापर्यंत ५८ लाख ७७ हजार ९९३ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदींच्या आधारे आठ लाख २५ हजार ८५१ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख ३८ हजार ४३० कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे..माजी न्या. संदीप शिंदे समितीचा चौथा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत गेल्या महिन्यात स्वीकारला आहे. समितीने शोधलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप मराठा समाजाला होत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.यापूर्वीच्या शिंदे समितीच्या अहवालापेक्षा कुणबी नोंदींमध्ये केवळ चार हजार ३८२ नोंदींची वाढ झाली आहे तर प्रमाणपत्र वाटपाच्या संख्येत लाखभराने वाढ झाली आहे. तिसऱ्या अहवालानुसार सहा लाख २७ हजार ९५३ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये आता एक लाख ९७ हजार ८९८ इतकीच वाढ झाली आहे..वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ५८ लाख नोंदींच्या आधारे साधारण एक कोटीपेक्षा जास्त लोकांना कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिंदे समितीने शोधलेल्या कुणबी पुराव्यांमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट होत आहे..प्रमाणपत्रासाठी १४ शिफारशीशिंदे समितीने राज्य सरकारला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा अधिक सोपेपणा कसा निर्माण करण्यात येईल अशा प्रकारच्या १४ शिफारशी केल्या आहेत. यापूर्वी दहा पुराव्यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळायचे. आता या पुराव्यांची संख्या ४२ करण्यात आली आहे. पुराव्यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे..शोधलेल्या नोंदींपैकी ५७ लाख ९८ हजार ४५७ नोंदींचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळांवर त्या अपलोड केल्या आहेत. मराठा समाजातील नागरिकांना यापैकी कुठल्याही एका पुराव्यांच्या आधारे आपली मराठा कुणबी नोंद मिळण्याबाबत पडताळणी करणे शक्य आहे.कुणबी जात प्रमाणपत्र अधिकाधिक जणांना मिळावीत यासाठी सुलभ शिफारशी समितीने केली असली तरी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कोणतीही शिफारस करण्यात आली नाही..जात प्रमाणपत्र वाटप (आकडेवारी)मराठवाडाआठ जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर २०२३ पासून दोन लाख सात हजार ५८३१९८६ ते २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत केवळ दोन हजार ३६३बीड जिल्ह्यात २२ हजार ५१५ कुणबी नोंदींआधारे एक लाख ३८ हजार ४३०अद्याप सहा हजार ५१३ अर्ज प्रलंबित.पुणेजिल्ह्यात एक लाख १५ हजार २०० प्रमाणपत्रांचे वाटपसात लाख दोन हजार ५१३ कुणबी नोंदीच्या आधारे एक लाख १५ हजार २०० प्रमाणपत्रांचे वाटपपुणे : ३७,१२७,सांगली: ७,७०४,सातारा : ९,१८२,सोलापूर : ४४,५२३, कोल्हापूर : १६,६६४ अशी संख्या.नाशिकआठ लाख २७ हजार ४६५ कुणबी नोंदींआधारे सर्वाधिक दोन लाख ४६ हजार ३४१ प्रमाणपत्रांचे वाटपआठ हजार ६०९ अर्ज अद्याप प्रलंबितसर्वाधिक एक हजार ७७५ अर्ज फेटाळले.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.