esakal | धक्कादायक! साठ वर्षीय महिलेवर बलात्कार; पीडितेची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime in latur.

शहरातील इंदिरा नगर भागातील पिडीता ही आपला मुलगा, सून व नातवासह राहत होती.

धक्कादायक! साठ वर्षीय महिलेवर बलात्कार; पीडितेची आत्महत्या

sakal_logo
By
Ratnakar Nalegaonkar

अहमदपूर (जि.लातूर): शहरातील इंदिरा नगर भागातील पिडीता ही आपला मुलगा, सून व नातवासह राहत होती. पिडीताचा मुलगा व सुन हे मजुरी तर स्वतः पिडीता आंबेजोगाई रोडवरील हॉटेलमध्ये सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत साफसफाईचे काम करते असे. 28 डिसेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजता पिडीत महिला घरी येऊन झोपी गेली होती.

29 डिसेंबर रोजी सकाळी झोपेतून उठल्यानंतर पिडीताने आपला मुलगा व सुन यांना सांगितले की घराशेजारी राहणारा आरोपी किशन रेणुकादास उगाडे याने मला रात्री अकरा वाजता जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून शेतात घेऊन गेला व माझ्यावर बळजबरी केली. त्यानेच मला परत घरी आणून सोडले व झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली तर तुझ्या सुनेला व मुलाला जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली आहे.

'हर्षवर्धन जाधवांचे राजकारणात 'कमबॅक', ग्रामपंचायतच्या निकालातून देणार उत्तर'

या घटनेने मला जगात तोंड दाखवायला जागा नाही असे म्हणून घराचे दार बाहेरून लावून घरात कुटुंबातील सदस्यांना कोंडवून काही एक न सांगता निघून गेली. सकाळी उठल्यानंतर शोधाशोध सुरू झाली दरम्यान पिडीताचा मृतदेह वाकी नदी पात्रातील तलावात आढळून आला. यासंदर्भात पिडीताच्या सुनेच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून आरोपीस लवकरात लवकर व कठोर शिक्षा करावी अशी मागणी पिडीताच्या नातेवाईकांनी केली आहे.

(edited by- pramod sarawale)