विद्यार्थ्यांना लसीसाठी ६५० विशेष केंद्रं; जागेवरच नोंदणीद्वारे मिळणार लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
विद्यार्थ्यांना लसीसाठी ६५० विशेष केंद्रं; जागेवरच नोंदणीद्वारे मिळणार लस

विद्यार्थ्यांना लसीसाठी ६५० विशेष केंद्रं; जागेवरच नोंदणीद्वारे मिळणार लस

सोलापूर : राज्यात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा जोर धरू लागला असून ओमिक्रॉनचा (Omicron) विळखाही घट्ट होऊ लागला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर आता प्राधान्याने १५ ते १८ वर्ष वयोगटातील ६०.१३ लाख मुलांना कोव्हॅक्‍सिनची लस (Covaxin) टोचली जाणार आहे. त्याची सुरवात सोमवारपासून (ता.३) होणार आहे. त्यासाठी ६५० विशेष केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. (650 special centers in Maharashtra for vaccinating students it will be available on the spot)

हेही वाचा: मुंबईत जमावबंदी लागू; एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवलं!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत १५ वर्षांवरील मुलांना धोका होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारच्या परवानगीनंतर ३ जानेवारीपासून लस टोचली जाणार आहे. कोव्हिशिल्ड लस दिल्यानंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो तर कोव्हॅक्‍सिन लशीचा दुसरा डोस २८ दिवसांनी देता येतो. या पार्श्‍वभूमीवर शाळकरी मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली आहे. सध्या राज्यात कोव्हॅक्‍सिनचे ४५ लाख डोस आहेत.

हेही वाचा: सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, निर्बंध वाढणार : राजेश टोपे

नियोजित केंद्रांशिवाय शाळेतही लसीकरण शिबिरे घेता येतील का? यादृष्टीने चाचपणी सुरु आहे. त्यामध्ये विशेषत: दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, त्यांना आधारकार्डवरुन जागेवरच लस टोचली जाईल, असेही सांगण्यात आले.

हेही वाचा: तात्पुरती रूग्णालये उभारा; ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांनंतर केंद्राच्या सूचना

याबाबत माहिती देताना आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. सचिन देसाई म्हणाले, ‘‘राज्यातील जवळपास ६० लाख विद्यार्थ्यांना कोव्हॅक्‍सिन लस दिली जाणार असून तीन महिन्यांत ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे’’

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top