No lockdown : सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, निर्बंध वाढणार : राजेश टोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope

सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, निर्बंध वाढणार : राजेश टोपे

कोरोना (coronavirus) आणि ओमिक्रॉनचे रुग्ण (omicron variant) मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून रुग्ण संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे निर्बंधात वाढ करण्यात आली होती. यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. कोव्हाही याची घोषणा होईल, असे बोलले जात होते. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी राज्यात लॉकडाऊन लागणार नसल्याचे (No lockdown) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्यात कोरोनाने (coronavirus) चांगलेच डोकं वर काढले आहे. यामुळे देशासह राज्यामध्ये चांगलेच भीतीचे वातावरण आहे. यामुळेच ३१ डिसेंबरपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. संचारबंदीनंतर पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागणार का? अशी अशी चर्चा सुरू झाली होती. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार (No lockdown) नसल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

हेही वाचा: ...अन् महिलेला विमानाच्या बाथरूममध्येच व्हावे लागले आयसोलेट

सद्य राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाही. लॉकडाऊनबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार नाही. परंतु, उपाययोजना म्हणून निर्बंध वाढवणार येणार आहे. ऑक्सिजनची गरज ७०० मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल असे, राजेश टोपे यांनी सांगितले.

नियमांचे आणि निर्बंधाचे पालन करणे गरजेचे

रुग्णालयात जास्त प्रमाणात बेड, आयसीयू आणि ऑक्सिजनची आवश्यकता लागू शकते. रुग्णालयांना किट्स वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉन आणि डेल्टा रुग्णांना ओळखणे गरजेचे आहे. सर्वांनी कोरोना नियमांचे आणि निर्बंधाचे पालन करणे गरजेचे आहे. रुग्णांची संख्या वाढू नये तसेच संसर्गावर आळा घालण्याला आमचे प्राधान्य आहे, असेही राजेश टोपे (rajesh tope) म्हणाले.

सध्या लॉकडाऊनची भीती बाळगू नका

मुंबईतील रुग्णसंख्या वाढण्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या आसपास गेला आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात. मेट्रो शहरांमध्ये निर्बंध अधिक कठोर केले जाऊ शकतात. मात्र, सध्या लॉकडाऊनची भीती बाळगू (No lockdown) नका. रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास निर्बंध आणखी कडक होऊ शकतात, असेही राजेश टोपे म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rajesh TopeLockdown News
loading image
go to top