मोठी बातमी! आजीवन दारू परवान्यासाठी "यांनी' केले ऑनलाइन अर्ज! 

तात्या लांडगे
Wednesday, 8 July 2020

दारू पिणाऱ्या व्यक्‍तींना परवान्यासाठी लॉकडाउनमुळे ऑफलाइन व ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणे मुश्‍कील झाल्याने आणि मद्यविक्री दुकानांसमोरील लांबलचक रांगांमुळे आजीवन परवान्याची मागणी वाढली आहे. मागील सहा महिन्यांतील 73 हजार अर्जांपैकी मार्च ते जून या चार महिन्यांत सर्वाधिक 63 हजार अर्ज एक्‍साईज विभागास प्राप्त झाले आहेत. 

सोलापूर : कोरोनामुळे अजीवन दारू परवान्यासाठी मागणी वाढली आहे. जानेवारी ते 30 जून या कालावधीत राज्यातील तब्बल 73 हजार 25 व्यक्‍तींनी अर्ज केले आहेत. त्यातून एक्‍साईज विभागाला सात कोटी 34 लाख रुपये मिळाले आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेल्या शहरातील व्यक्‍तींचा समावेश असून, सोलापुरातून एक हजार 505 व्यक्‍तींनी दारू पिण्यासाठी आजीवन परवाना मागितला आहे. 

हेही वाचा : म्हणून "हा' पॅटर्न आला चर्चेत; आठ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट 

दारू पिणाऱ्या व्यक्‍तींना परवान्यासाठी लॉकडाउनमुळे ऑफलाइन व ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणे मुश्‍कील झाल्याने आणि मद्यविक्री दुकानांसमोरील लांबलचक रांगांमुळे आजीवन परवान्याची मागणी वाढली आहे. मागील सहा महिन्यांतील 73 हजार अर्जांपैकी मार्च ते जून या चार महिन्यांत सर्वाधिक 63 हजार अर्ज एक्‍साईज विभागास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार मुंबई उपनगर व मुंबई शहरातून 25 हजार 455 अर्ज आले आहेत. तर ठाण्यातून 10 हजार 97, नागपूरमधून 11 हजार 970 जणांनी अर्ज केले आहेत. तसेच औरंगाबादमधून दोन हजार 500 तर पुण्यातून तीन हजार मद्यपींनी आजीवन परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापाठोपाठ सोलापूर एक हजार 505, नांदेड एक हजार 486, नाशिकमधून एक हजार 283, परभणीतून एक हजार 143, लातूरमधून एक हजार 185, अमरावतीतून एक हजार 787, पालघरमधून एक हजार 109 जणांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती एक्‍साईज विभागाकडून देण्यात आली. 

हेही वाचा : अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राज्य सरकार तोंडघशी! उच्च शिक्षणमंत्र्यांनी लिहिले केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र अन्‌ म्हणाले... 

लॉकडाउन काळात वाढले अर्जांचे प्रमाण 
दारू पिणाऱ्यांसाठी एक दिवसाचा, एक वर्षाचा आणि आजीवन दारू परवाना दिला जातो. आजीवन दारू परवान्यासाठी एक हजार पाच रुपयांची फी आकारली जाते. कोरोनामुळे देशभर लॉकडाउन असल्याने आजीवन दारू परवान्यासाठी अर्जांची संख्या वाढली असून जानेवारी ते 30 जून 2020 या काळात एक्‍साईज विभागाला सात कोटी 33 लाख 90 हजार 125 रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती एक्‍साईजचे सहाय्यक आयुक्त यतीन सावंत यांनी दिली. 

लॉकडाउन काळातील ठळक बाबी... 

  • राज्यातील विविध जिल्ह्यांमधील आठ हजार 357 दारू दुकानांमधून सुरू आहे मद्यविक्री 
  • अवैध मद्यविक्री प्रकरणी आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक गुन्हे दाखल 
  • राज्याच्या अंमलबजावणी व दक्षता विभागास 3 मेपासून मिळाला साडेतीन हजार कोटींचा महसूल 
  • गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा जिल्हा वगळता अन्य शहर-जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे मद्यविक्री 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 73,000 alcoholics applied online for a lifetime liquor license